'बाहुबली'मधील शिवगामी देवी खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टाईलिश, पाहा फोटो

'बाहुबली'  हा चित्रपट पडद्यावर ब्लॉकबस्टर ठरला.

Updated: Feb 11, 2022, 10:23 PM IST
'बाहुबली'मधील शिवगामी देवी खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टाईलिश, पाहा फोटो title=

मुंबई : 'बाहुबली'  हा चित्रपट पडद्यावर ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने देशातच नव्हेतर संपूर्ण जगात  कौतुक मिळवलं.  चित्रपटातील प्रत्येक पात्राने चित्रपटात जीव ओतला होता. अमरेंद्र बाहुबली असो, कटप्पा असो किंवा मग शिवगामी. या चित्रपटात शिवगामी देवीची भूमिका रम्या कृष्णन यांनी केली होती. त्यांनी या व्यक्तिरेखेसाठी जीव ओतला होता, पण शिवगामी म्हणजेच रम्या कृष्णन खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

लेटेस्ट फोटो पाहून चाहते हैराण
शिवगामी देवी म्हणजेच रम्या कृष्णन सोशल मीडियावर  स्टायलिश फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. रम्या कृष्णन खऱ्या आयुष्यात खूप सुंदर आणि स्टायलिश आहे. तिचे लेटेस्ट फोटो पाहून तिला ओळखणंही अवघड आहे. शेअर केलेल्या या सेल्फीमध्ये रम्या खूपच सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर दुसरा फोटो तिच्या साडीतला आहे. ज्यामध्ये तिने चमकदार साडी नेसलेली दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बाहुबालीनंतर क्वीनमधून जिंकली चाहत्यांची मने  
रम्या कृष्णनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर बाहुबली व्यतिरिक्त ती 'खलनायक', 'चाहत', 'ओथ', 'बनारसी बाबू'मध्ये दिसली होती. याशिवाय तिने वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. तिने 'क्वीन' सिरीजमध्ये काम केलं आहे.