'अजय देवगणमुळे मी आजही सिंगल'

अजय देवगणमुळे मी आजही सिंगल असल्याचं वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री तब्बूनं केलं आहे. 

Updated: Jun 29, 2017, 04:35 PM IST
'अजय देवगणमुळे मी आजही सिंगल' title=

मुंबई : अजय देवगणमुळे मी आजही सिंगल असल्याचं वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री तब्बूनं केलं आहे. या गोष्टीचा अजयला पश्चाताप व्हायला हवा, असंही तब्बू म्हणाली आहे. अजय देवगणला मी मागच्या २५ वर्षांपासून ओळखत आहे.

अजय आणि माझा चुलत भाऊ समीर आर्य जवळचे मित्र आहेत आणि ते एकमेकांचे शेजारीही आहेत. त्यावेळी अजय आणि समीर माझ्यावर लक्ष ठेवून असायचे. कोणताही मुलगा माझ्याशी बोलायला आला तर त्याला मारायची धमकी द्यायचे. अजयच्या या वागण्यामुळे मी सिंगल आहे, असं तब्बू एका मुलाखतीत म्हणाली आहे.

रोहित शेट्टीच्या गोलमाल अगेन या चित्रपटात तब्बू दिसणार आहे. तब्बल १० वर्षांनी तब्बू परत विनोदी भूमिकेत दिसेल. माझ्या गंभीर आणि रडक्या भूमिका पाहून आई कंटाळली आहे. या भूमिकेमुळे आईची इच्छाही पूर्ण होईल असं तब्बू म्हणाली आहे.