'सेन्सॉर बोर्डाच्या बुरख्या'तून अखेर 'लिपस्टिक बाहेर आली'

हा सिनेमा भारतात रिलीज करण्यास सेन्सॉर बोर्डने मनाई केली होती. अखेर हा सिनेमा २१ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

Updated: Jun 29, 2017, 02:19 PM IST

मुंबई : 'सेन्सॉर बोर्डच्या बुरख्या'तून अखेर 'लिपस्टिक बाहेर आली आहे कारण, अनेक दिवसापासून सुरू असलेल्या वादानंतर 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या सिनेमाचा प्रोमो अखेर रिलीज झाला आहे. 

हा सिनेमा भारतात रिलीज करण्यास सेन्सॉर बोर्डने मनाई केली होती. अखेर हा सिनेमा २१ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

या सिनेमाचा ट्रेलरही बोल्ड आहे, यात शिव्याही आहेत. सेन्सॉर बोर्डने या सिनेमावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते, ते देखील यात दाखवण्यात आले आहेत. 

हा एक महिला प्रधान सिनेमा असल्याचं म्हटलं जात आहे. हा सिनेमा अखेर २१ जुलै रोजी रिलीज होणार आहे.

 या सिनेमात कोंकणा सेनशर्मा, रत्ना पाठक शहा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याचबरोबर सुशांत सिंह, विक्रम मेसी यांचाही समावेश आहे.