मी मुलगी आहे, भारतीय आहे आणि भारतात मला सुरक्षित वाटते - हुमा कुरेशी

बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी नुकतीच आपला आगामी सिनेमा 'पार्टीशन: 1947' च्या प्रमोशनसाठी दिल्लीला गेली होती. यावेळी तिने एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत हुमा म्हणाली, मी एक मुलगी आहे. भारतीय आहे आणि भारतात मला सुरक्षित वाटते.

Updated: Aug 13, 2017, 10:48 PM IST
मी मुलगी आहे, भारतीय आहे आणि भारतात मला सुरक्षित वाटते - हुमा कुरेशी title=

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी नुकतीच आपला आगामी सिनेमा 'पार्टीशन: 1947' च्या प्रमोशनसाठी दिल्लीला गेली होती. यावेळी तिने एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत हुमा म्हणाली, मी एक मुलगी आहे. भारतीय आहे आणि भारतात मला सुरक्षित वाटते.

हुमाने हे विधान भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी अखेर दिवशी केलेल्या भाषणात मुसलमान असुरक्षित असल्याचे म्हटले होते. यानंतर हुमाने हे विधान केलंय.

हुमा पुढे म्हणाली, भारताच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत आहेत आणि इतक्या चांगल्या वातावरणात सकारात्मक गोष्टी चांगल्या वाटतात. 'पार्टीशन: 1947' या सिनेमाचे दिग्दर्शन गुरिंदर चढ्ढा करत आहेत.