सिनेमातील कलाकार मालिकेतील कलाकारांना असं वागवतात ?..ऋता दुर्गुळेचा धक्कादायक खुलासा

..पण यात कोणाचं नाव घेऊ इच्छित नसल्याचं ऋता म्हणाली.

Updated: Aug 28, 2022, 12:30 PM IST
सिनेमातील कलाकार मालिकेतील कलाकारांना असं वागवतात ?..ऋता दुर्गुळेचा धक्कादायक खुलासा title=

HRUTA DURGULE REVEALS TRUTH : ऋता दुर्गुळे हीचा 'अनन्या' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद सिनेमाला लाभला आहे.

ऋताच्या अभिनयाचं खूप कौतुकसुद्धा केलं जात आहे नुकतेच हृताने झी मराठी वाहिनीवरील सुबोध भावेंच्या  'बस बाई बस' या कार्यक्रमाला हजेरी लावली होती यावेळी हृताने खूप धमाल केली.

ऋताला यावेळी सुबोध भावेंनी अनेक प्रश्न विचारले त्यांची उत्तर हृताने अगदी मनमोकळेपणाने दिली. सुबोधने आणखी एक मुख्य प्रश्न ऋताला यावेळी विचारला  ''मोठ्या पडद्यावरील अर्थात सिनेमातील कलाकार मालिकेतील कलाकारांना कमी लेखतात का?'' यावर ऋताने ''होय'' असं उत्तर दिलं. ऋताच्या या उत्तराची सध्या जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

‘बस बाई बस’ हा मराठी चॅट शो बघता बघता घराघरात पोहोचला आहे. या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. शो मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सेलिब्रिटीज येतात आणि सुबोध भावे यांच्यासोबत धम्माल गप्पा मा रतात. त्यामुळे महिला वर्गांमध्ये हा शो चांगलाच प्रसिद्ध झाला आहे.

तुझ्यासोबत सुद्धा असं घडलाय का असं विचारल्यावर  हृताने आधी नाही असं उत्तर दिल पण तिचा रोख हा होकारार्थीच होता पण यात कोणाचं नाव घेऊ इच्छित नसल्याचं ऋता म्हणाली.शिवाय मालिकेतील कलाकार सिनेमातील कलाकारांपेक्षा जास्त लोकप्रिय असतात असा टोमणा मारायलाही ऋता विसरली नाही.