'सलमान खानने मला...', घटस्फोटानंतर कोणावर संतापली Malaika Arora? मोठं सत्य समोर

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी काही वर्षांपूर्वी एकमेकांना घटस्फोट देत विभक्त होण्याचा निर्णय घेतला.   

Updated: Aug 28, 2022, 12:12 PM IST
'सलमान खानने मला...', घटस्फोटानंतर कोणावर संतापली Malaika Arora? मोठं सत्य समोर  title=

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान यांनी काही वर्षांपूर्वी एकमेकांना घटस्फोट देत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर अरबाज आणि मलायका विभक्त झाले असले तरी, एका कारणामुळे कायम एकत्र येतात आणि ते कारण आहे त्यांचा मुलगा अरहान खान. नुकताच अरबाज, मलायका आणि अरहानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ज्यामध्ये दोघे मुलाला सोडायला विमानतळावर पोहोचले होते. अरहान सध्या परदेशात स्वतःचं शिक्षण पूर्ण करत आहे. अरबाज आणि मलायका विभक्त झाले असले तरी, त्यांच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात. 

मलायका आणि अरबाजने लग्नाच्या 19 वर्षानंतर 2017 मध्ये घटस्फोट घेतला. मात्र घटस्फोटानंतर मलायकाला स्वतःला सेल्फ मेड असल्याचं म्हणावं लागलं. 'दिल से'मधील 'छैयां छैयां' आणि त्यानंतर 'दबंग' चित्रपटातील 'मुन्नी बदनाम हुई' या आयटम साँगने मलाइकाने इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली.

मलायकाला आयटम साँगमध्ये मिळत असेलल्या लोकप्रियतेबद्दल बॉलिवूडची ड्रामा क्विन म्हणाली, 'सलमान खानच्या कुटुंबातील असल्यामुळे तिला सिनेमांमध्ये आयटम साँग करण्याची संधी मिळते...' राखीच्या या वक्तव्यावर मलायकाने परखड मत मांडलं. 

मलायका म्हणाली, 'सलमानने मला बनवलं नाही. असं असतं तर मी सलमानच्या प्रत्येक सिनेमात दिसली असती. स्वतःच्या बळावर मी स्थान पक्क केलं आहे. मी सेल्फ मेड आहे...' असं म्हणत मलायकाने स्वतःचा संताप व्यक्त केला. 

मलायका आणि अरबाजच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, लग्नाच्या 19 वर्षांनंतर दोघांनी वेगळ राहाण्याचा निर्णय घेतला. आता दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. मलायका अभिनेता अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.