हृतिकची गर्लफ्रेंड त्याच्या पहिल्या पत्नीला 'या' नावाने बोलावते

हृतिकची गर्लफ्रेंड आणि त्याच्या पहिल्या पत्नीचं कसं आहे नातं? त्या पोस्टमुळे समोर   

Updated: Mar 13, 2022, 03:54 PM IST
हृतिकची गर्लफ्रेंड त्याच्या पहिल्या पत्नीला 'या' नावाने बोलावते  title=

मुंबई : हृतिक रोशन आणि सबा आझाद फेब्रुवारीमध्ये डिनक डेटनंतर रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले तेव्हापासून  चर्चेत आहेत. आता दोघांनीही एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करून प्रोत्साहन देत असतात. एवढंच नाही तर हृतिकची पहिली पत्नी सुझान खान देखील सबा आझादच्या सोशल मीडियावर पोस्टवर कमेंट करत  मनातील भावना व्यक्त करते. नुकताच एका पोस्टमध्ये सबा आझाद सुझानला एका खास नावानं हाक मारत असल्याचा खुलासा झाला आहे.

एक व्हिडीओ शेअर करत सबाने कॅप्शनमध्ये, 'स्क्रिन टेस्ट करणं आवडतं. पण लाोकांना असं करणं का आवडत नाही? सर्वांना कलेची परीक्षा घ्यायला हवी. तुम्ही रोज वेगवेगळ्या भूमिका जगता आणि त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करता यापेक्षा उत्तम काय असू शकतं.’

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सबाच्या या व्हिडीओवर कमेंट करत सुझान खाननं लिहिलं, ‘खुपच सुंदर, मला आवडलं.’ सुझानच्या या कमेंटला रिप्लाय करताना सबानं लिहिलं, ‘धन्यवाद सूझ…’ सबाच्या कमेंटमुळे कळालं की ती सुझानला ‘सूझ’ या नावाने हाक मारते. 

हृतिक आणि सबा विभक्त झाले असले तरी मुलांसाठी दोघंही अनेकदा एकत्र येतात.  एवढंच नाही तर आता सबा आझाद आणि सुझान खान यांच्यातही खूप चांगलं बॉन्डिंग असल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे.