हाऊसफूल-५ प्रेक्षकांच्या भेटीला येणार, अक्षय कुमारसोबत दिसणार हे सेलिब्रिटी

अक्षय कुमारचा कॉमेडी फ्रँचायझी हाऊसफुल चित्रपटाचा ५ वा सिनेमा लवकरच तयार होणार आहे.

Updated: Dec 10, 2020, 04:59 PM IST
हाऊसफूल-५ प्रेक्षकांच्या भेटीला येणार, अक्षय कुमारसोबत दिसणार हे सेलिब्रिटी title=

मुंबई : अक्षय कुमारचा कॉमेडी फ्रँचायझी हाऊसफुल चित्रपटाचा ५ वा सिनेमा लवकरच तयार होणार आहे. 'हाऊसफुल 5' बाबत साजिद नाडियाडवाला आणि अक्षय कुमार यांच्यात बोलणी सुरु आहे. हे दोघे एकत्र या चित्रपटासाठी सर्वात मोठे स्टारकास्ट एकत्र आणतील. एका वृत्तानुसार, 'हाऊसफुल-५' 'मध्ये दीपिका पादुकोण, कृती सेनन, अभिषेक बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, जॉन अब्राहम आणि मागील चित्रपटातील काही स्टारही दिसणार आहेत.

या चित्रपटासाठी फ्रँचायझीच्या जुन्या चित्रपटांतील अनेक नामांकित चेहरे आणि पात्र एकत्र केले जातील. हा एक मोठा चित्रपट असेल असे अहवालात म्हटले आहे. चित्रपटात अनेक मोठे चेहरे एकत्र दिसणार आहेत. साजिद आणि टीम या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करण्यास सुरुवात करणार आहेत. आयएमएक्स फॉरमॅटनुसार या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. यापूर्वी बाहुबली आणि पद्मावत या स्वरूपावर चित्रीत करण्यात आले आहे.

या फ्रेंचायझीचा मागील चित्रपट 'हाऊसफुल 4' बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा ओलांडला. दीपिका पादुकोण ही सिद्धांत चतुर्वेदी आणि अन्नाया पांडे यांच्यासोबत शकुन बत्राच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

कृती सेनन अलीकडेच कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. जॉन अब्राहम सध्या शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. अभिषेक बच्चनने नुकत्याच लुडो चित्रपटात आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. त्याचबरोबर तो एका नवीन चित्रपटाच्या शूटिंगमध्येही व्यस्त आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x