शेतातील फोटो शेअर करत सलमान म्हणाला...
मुंबई : बॉलिवूडच्या 'बॉडीगार्ड'ने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो शेतात काम करताना दिसत आहे. हातात कुदळ घवून तो मातीत घाम गाळताना दिसत आहे. त्याचा हा अनोखा अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधत आहे. सलमानचा हा फोटो शेतकऱ्यांना पाठिंबा देत असल्याचं दिसून येत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. देशात सध्या शेतकरी आंदोलनामुळे वातावरण तापलं आहे. त्यात सलमानचा शोतात काम करणारा फोटो बरचं काही सांगत आहे.
हा फोटो शेअर करत त्याने 'मातृ पृथ्वी...' असं कॅप्शन दिलं आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा हो फोटो तुफान व्हायरल होत आहे. सलमानचा हा फोटो लॉकडाउन दरम्यानचा आहे. लॉकडाउनमुळे तो बराच काळ पनवेलच्या फार्म हाउसवर थांबला होता.
यावेळी त्याच्यासोबत त्याचं कुटुंब देखील होतं. लॉकडाउन नंतर त्याने आपला मोर्चा पुन्हा आपल्या कामाकडे वळवला आहे. सलमान लवकरच 'राधे' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. शिवाय त्याने सध्या शुटिंग सुरू असलेल्या 'अंतिम' चित्रपटाचा देखील एक लूक शेअर आहे.
चित्रपटात सलमानची भूमिका वेगळ्या थाटणीची असणार आहे. चित्रपटात तो पोलीस कर्मचाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेता आयुष शर्मा एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. 'अंतिम' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या खांद्यावर आहे.
शेतातील फोटो शेअर करत सलमान म्हणाला...