'ही' Thyroid सारखी लक्षणे तुम्हालाही जाणवतात का? याकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात

थायरॉइडचे कमी किंवा जास्त होणे कर्करोगाचे कारण बनु शकते.या दोन्ही समस्यांची बहुतेक लक्षणे सारखीच असतात. त्यामुळे या लक्षणांविषयी सविस्तर जाणून घ्या.

Updated: Jan 14, 2025, 06:05 PM IST
'ही' Thyroid सारखी लक्षणे तुम्हालाही जाणवतात का? याकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात title=

Similar symptoms Thyroid and Cancer: थायरॉइड म्हणजे गळ्याच्या भागात असलेली एक ग्रंथी आहे. ही थायराइडची ग्रंथी हार्मोन तयार करते. हे हार्मोन शरीराच्या ऊर्जा वापराचे (मेटाबॉलिझम) आणि शरीराच्या वाढीचे नियंत्रण करते. थायरॉइड हार्मोन कमी किंवा जास्त झाल्यास शरीरावर विपरित परिणाम होतो.  

थायरॉइड हार्मोन जास्त झाल्यास वजन कमी होणे, हृदयाचे ठोके वाढणे, चिंता आणि थकवा यांसारख्या समस्या उद्भवतात. थायरॉइड हार्मोन कमी झाल्यास थकवा, वजन वाढणे, थंडी जाणवणे आणि उदासीनता अशा समस्या निर्माण होतात.  
आजकाल थायरॉइडशी संबंधित समस्या अनेकांमध्ये दिसून येतात. परंतु, याकडे दुर्लक्ष केल्यास ही समस्या कर्करोगात बदलू शकते. त्यामुळे थायरॉइडशी संबंधित कोणतेही लक्षण दिसल्यास वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. कर्करोग अजून प्राथमिक अवस्थेत असल्याचे जाणवल्यास या महारोगापासून बचाव करणे शक्य आहे. त्यामुळे त्याच्या लक्षणांविषयी जाणून घ्या.  

ही लक्षणे तुम्हालाही जाणवतात का?

1. मानेमध्ये गाठ किंवा सूज  
गळ्याजवळ गाठ तयार होणे हे थायरॉइड कर्करोगाचे प्राथमिक लक्षण असू शकते. ही गाठ हालत नाही आणि औषधांनीही बरी होत नाही. गळ्याच्या भागात सूज जाणवते. सर्व गाठी कर्करोगजन्य नसतात, पण अशी गाठ दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.  

2. घास गिळताना त्रास होणे  
जेवताना घास गिळण्यात किंवा पाणी पिताना अडथळा जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण आरोग्याच्या बाबतीत केलेला निष्काळजीपणा महागात पडू शकतो.  

3. आवाजात बदल होणे  
थायरॉइड आणि कर्करोगामुळे व्होकल कॉर्ड्सवर परिणाम होतो, ज्यामुळे आवाजात जडपणा येतो किंवा बोलताना त्रास होतो.  

4. गळ्यात वेदना  
गळ्यात सतत वेदना राहणे हेही कर्करोगाचे लक्षण असू शकते. या वेदना सर्दी किंवा खोकल्यामुळे होतात पण यावर नीट उपचार केला नाहीत तर हे धोकादायक ठरू शकते.  

5. लिंफ नोड्समध्ये सूज  
कानाखाली किंवा गळ्याच्या बाजूला असलेल्या लिंफ नोड्समध्ये सूज येते. वेळेवर उपचार घेतले नाही तर ही सूज वेळेसोबत वाढत जाते. कालांतराने ही सूज कर्करोगाचं कारण बनते.  

6. श्वास घेण्यात अडथळा  
थायरॉइड ग्रंथी वाढल्यामुळे श्वसन नलिकेवर दाब येतो आणि श्वास घेणे कठीण होते.  

7. सतत खोकला  
कर्करोगामुळे होणारा खोकला सामान्य सर्दी-खोकल्यासारखा नसतो आणि तो साधारण उपचारांनीही बरा होत नाही. त्यामुळे जर एका आठवड्याहून जास्त काळ सर्दी किंवा खोकल्याचा त्रास होत असल्यास त्वरित निदान गरजेचे आहे.  

कॅन्सर टाळण्यासाठी काही सवयी लावणे गरजेचे आहे.  
1. सकाळी लवकर उठून योगा करणे  
2. निरोगी आहार घ्या  
3. तळलेले जास्त प्रमाणात खाऊ नका  
4. भरपूर झोप घ्या  
5. दिवसातून 4 लिटर पाणी प्या  
6. व्यायाम करणे आवश्यक  
थायरॉइडच्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. लक्षणे जाणवली की त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेत उपचार घेतल्यास गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात.