सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्याने या अभिनेत्रीला बसला जबरदस्त धक्का

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने  2 सप्टेंबरला या जगाचा कायमचा निरोप घेतला. 

Updated: Sep 4, 2021, 05:04 PM IST
सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्याने या अभिनेत्रीला बसला जबरदस्त धक्का title=

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने  2 सप्टेंबरला या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्याच्या अकाली निधनाने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याच्या मृत्यूला दोन दिवस झाले असले तरी लोक अजूनही हे सत्य स्वीकारू शकत नाहीत की, सिद्धार्थ वयाच्या चाळीसाव्या वर्षी हे जग सोडून गेलाय. टीव्ही अभिनेत्री हिना खानच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. सिद्धार्थच्या मृत्यूमुळे हिना आतून पुर्णपणे तुटली आहे.

हिना खानचं भावनिक ट्विट
सिद्धार्थ शुक्ला पंचतत्वात विलीन झाल्यानंतर अभिनेत्री हिना खानने एक भावनिक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये हिनाने सिद्धार्थच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे आणि त्यांच्या स्थितीबद्दल स्पष्टीकरण देताना त्याच्यासाठी प्रार्थना केली आहे. तिने ट्विटमध्ये लिहिलं की, - जेव्हा आपण जीवनातील आंबट -गोड अनुभवातून जात असतो, तेव्हाच आपण जीवनाला आणखी चांगल्या प्रकारे समजू शकतो, कदाचित तेव्हाच जीवनाचं एक नवीन रूप कल्पनेच्या पलीकडे जातं.

दुसऱ्या ट्वीटमध्ये व्यक्त केली आपली व्यथा 
आणखी एक पोस्ट शेअर करत, हिना तिचं आरोग्य आणि मानसिक स्थिती व्यक्त करताना लिहिते - आधीच एक कटू सत्याचा सामना करत होती की, माझा मित्र सिद्धार्थ गमावल्यानंतर मला भीती वाटतेय. मी अस्वस्थ आहे आणि आजारी देखील आहे, या दुःखद परिस्थितीचा सामना करण्यासाठी मी स्वतःशी झगडत आहे. हिनाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

लोक तिच्या पोस्टवर कमेंट देऊन या दुःखावर मात करण्यासाठी संदेश शेअर करत आहेत. आपल्याला सांगू की नुकतंच हिना खानने तिच्या वडिलांना गमावलं आहे, त्यानंतर ती तिच्या मित्राला गमावल्यानंतर तिला धक्का बसला आहे. हिनाने तिच्या पोस्टमध्ये या गोष्टींचा उल्लेख केला आहे.