विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाबाबत आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी बातमी

आजकाल कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या अफेअरची बरीच चर्चा आहे.

Updated: Sep 4, 2021, 04:21 PM IST
विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाबाबत आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी बातमी title=

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीमधल्या लव्हस्टोरी अनेकदा चर्चेत असतात. सहसा, एखाद्याच्या अफेअरचे किस्से बी-टाऊनच्या कॉरिडॉरमध्ये गुंजत राहतात. आजकाल कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या अफेअरची बरीच चर्चा आहे. विकीला कतरिनाच्या अपार्टमेंटखाली अनेकवेळा स्पॉट केलं गेलं आहे. त्याचवेळी, काही दिवसांपूर्वी कतरिना आणि विकीने गुपचूप साखरपुडा केल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र आता एक अशी एक बातमी समोर येत आहेत की, दोघंही या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. एका अहवालात दोघांच्या लग्नाबाबत दावा करण्यात आला आहे. मात्र, विकी किंवा कतरिना दोघांनीही लग्नाबाबत कोणतेही अधिकृत घोषणा जारी केलेली नाही.  

कतरिना-विकीच्या साखरपुड्याची बातमी जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हा चाहत्यांनी त्यांचं अभिनंदन करण्यास सुरुवात केली. मात्र, विक्कीचे वडील श्याम कौशल यांनी आपल्या मुलाची एंगेजमेंट झाली नसल्याचं सांगून या वृत्ताचं खंडन केलं. जेव्हा याची पुष्टी झाली नाही, तेव्हा चाहत्यांनीही ही बातमी अफवा म्हणून स्वीकारली.

आता बातमी येत आहे की, कतरिना आणि विकी लवकरच लग्न करणार आहेत. कतरिना कैफ आजकाल भारताबाहेर आहे. ती रशियामध्ये सलमान खानसोबत टायगर 3चं शूटिंग करत आहे. एका अहवालानुसार या दोघांच्या लग्नाबाबत दावा करण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, दोघंही राजस्थानच्या उदयपूरमध्ये लग्न करणार आहेत आणि यासाठी तयारी देखील केली जात आहे. बातमीनुसार, दोघांचं कुटुंबीय या लग्नात सहभागी होणार आहेत.

एका अहवालात दावा केला होता की, दोघांच्या साखरपुड्यांच्या बातम्यांमुळे खूप वादविवाद झाले होते. साखरपुड्यांच्या बातमीने दोघंही नाराज असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. विकी आणि कतरिना दोघांचेही बरेच चित्रपट आहेत आणि दोघांनाही त्यांच्या कामाची चर्चा माध्यमांमध्ये व्हावी, त्यांच्या नात्याबद्दल नाही. असं वाटतं

काही दिवसांपूर्वी हे दोघंही सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या शेरशाह चित्रपटाच्या प्रदर्शनाला पोहोचले होते. पण जेव्हा हे दोघे चित्रपट बघून बाहेर आले तेव्हा या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं.