हीरामंडी खरंच Redlight Area होती की करण्यात आली? 'तो' इतिहास खडबडून जागे व्हाल

Heeramandi चा इतिहास तुम्हाला माहितीये का... कधी होता खूप खास आणि आज...

Updated: Feb 20, 2023, 10:31 AM IST
हीरामंडी खरंच Redlight Area होती की करण्यात आली? 'तो' इतिहास खडबडून जागे व्हाल title=

Heeramandi's History : बॉलिवूड लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचं नावच पुरेसे आहे. भन्साळी यांची ओळख हटके चित्रपट बनवण्यासाठी आहे. संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट म्हटला की ते भव्य आणि महागड्या सेटसाठी ओळखले जातात. ‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट अजूनही ओटीटीवर प्रेक्षक पाहत आहेत. इतक्यात संजय लीला भन्साळी आता लवकरच 'हीरामंडी' वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करणार आहेत. नुकताच या वेब सीरिजचा फर्स्ट लूक समोर आला आहे. OTT प्लॅटफॉर्मवर ही वेब सीरिज पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. पण 'हीरामंडी' नक्की काय आहे हे कोणाला माहित आहे का? चला तर जाणून घेऊया 'हीरामंडी' विषयी सगळ्या गोष्टी...

'हीरामंडी' हा पाकिस्तानातील लाहोर येथे असलेला एक रेडलाइट एरिया आहे. हा एरिया 'शाही मोहल्ला' म्हणूनही ओळखला जाता. फाळणी होण्यापूर्वी 'हीरामंडी'च्या देह विक्री करणाऱ्या महिला देशभरात लोकप्रिय होत्या. त्याकाळात येथे राजकारण, प्रेम ते फसवणूक सगळ्या गोष्टी पाहायला मिळत होत्या. मुघल काळात अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानमधील महिलाही 'हीरामंडी' मध्ये राहायला आल्या होत्या. त्यावेळी 'तवायफ' म्हणजेच देह विक्री करणाऱ्या हा शब्द घाणेरड्या नजरेनं पाहिला जात नव्हता. मुघल काळात तवायफ या संगीत, कला, नृत्य आणि संस्कृतीशी संबंधित होत्या. हा तो काळ होता जेव्हा तवायफ फक्त राजे आणि सम्राटांचे मनोरंजन करत असत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हळूहळू काळ बदलला आणि जसा काळ बदलत गेला त्यासोबतच आजूबाजुच्या सगळ्या गोष्टी देखील बदलू लागल्या. इंग्रजांच्या राजवटीत हिरामंडीची चमक ओसरु लागली. इतकंच नाही तर इंग्रजांनी 'हीरामंडी'च्या महिलांना वेश्या हे नाव दिले. 'हीरामंडी' ची खरी ओळख आणि चमक ही कमी होऊ लागली होती. आजही लोक त्यांच्याकडून घाणेरड्या नजरेनं पाहतात. स्वातंत्र्यानंतर सरकारनं इथे येणाऱ्यांसाठी अनेक चांगल्या सुविधा दिल्या मात्र, त्याचा काही फायदा झाला नाही. 

हेही वाचा : Kriti Sanon म्हणजे बॉलिवूडची पनवती? 'हा' खान बोलताच वळल्या सर्वांच्या नजरा

हीरामंडी हे नावं कसे देण्यात आले? 

शीख महाराजा रणजित सिंग यांचे मंत्री हीरा सिंग डोगरा यांच्या नावावरून 'हीरामंडी' हे नाव देण्यात आले, असे म्हटले जाते. 'हीरासिंह' यांनीच येथे अनाज मंडीचा निर्माण केला होता. त्यानंतर याचं नाव 'हीरामंडी' असे ठेवण्यात आले. करण जोहरच्या 'कलंक' चित्रपटात पहिल्यांदा 'हीरामंडी'चा उल्लेख करण्यात आला होता. आधी ज्या प्रमाणे ही हीरामंडी होती आता तशी राहिलेली नाही. त्या काळात हा एक शाही मोहल्ला होता आणि आता तसं काही राहिलेलं नाही. दिवसा ही एक सामान्य बाजारपेठसारखी दिसते. तर संध्याकाळ होताच हीरामंडी ही रेड लाइट एरिया दिसते. 

वेब सिरीज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार

याच हीरामंडीवर ही वेब सीरिज आधारीत आहे. परवाच्या दिवशी या वेब सीरिजचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओच्या सुरुवातीला संजय लीला भन्साळी यांचे नाव दिसत आहे. यानंतर मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, शर्मीन सेगल, रिचा चढ्ढा आणि शेवटी सोनाक्षी सिन्हा यांची झलक पाहायला मिळते. सर्वजण पिवळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये रॉयल लूकमध्ये दिसत आहेत. या वेबसिरीजमध्ये ओटीटीमध्येही पदार्पण करत आहे. यासाठी दिग्दर्शकाने नेटफ्लिक्सशी हातमिळवणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही वेब सीरिज बनवण्यासाठी मोठी रक्कम गुंतवणार आहे. 

दरम्यान संजय लीला भन्साळी पहिल्यांदा वेब सीरिजचं दिग्दर्शक करत आहेत. ‘गंगूबाई काठियावाडी’नंतर ते ‘हीरामंडी’तून देहविक्री करणाऱ्या स्त्रियांची कथा मोठ्या पडद्यावर मांडताना दिसणार आहेत. मात्र ही वेब सीरिज कधी प्रदर्शित होणार याबाबत कोणतीही माहिती अद्याप शेअर करण्यात आलेली नाही