कोरोना लसीमुळे Shreyas Talpade याला हार्ट अटॅक? अभिनेता म्हणाला 'लसीकरणानंतरच...'

Shreyas Talpade on Covidshield : कोविशील्ड लसीसंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे येत असताना श्रेयस तळपदेने त्याला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याबद्दल काही दावे केले आहेत. त्यानंतर सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे. 

नेहा चौधरी | Updated: May 5, 2024, 08:58 AM IST
कोरोना लसीमुळे Shreyas Talpade याला हार्ट अटॅक? अभिनेता म्हणाला  'लसीकरणानंतरच...'  title=
Heart attack to Shreyas Talpade due to corona vaccine The actor said only after Covidshield vaccination

Shreyas Talpade on Covidshield : कोरोनाच्या संकटातून बचाव करण्यासाठी कोविशील्ड ही लस असंख्य लोकांना देण्यात आली. त्यानंतर आज तीन वर्षांनी या कोविशील्ड लसीबद्दल धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. AstraZeneca यांनी या लसीमुळे काही दुर्मिळ परिणाम आपल्या शरीरावर दिसून येत आहेत, असा खुलासा केल्यानंतर सर्वांना धक्का बसलाय. त्यात बॉलीवूड अभिनेता श्रेयस तळपदेने कोविड लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. (Heart attack to Shreyas Talpade due to corona vaccine The actor said only after Covidshield vaccination)

डिसेंबर 2023 मध्ये वयाच्या 47 व्या वर्षी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला होता. वेलकम टू द जंगलच्या शूटिंगदरम्यान त्याची तब्येत बिघचली आणि घरी गेली. पत्नीने ताबडतोब त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना त्याला रस्त्यातच हृदयविकाराचा झटका आला. त्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. कोरोनानंतर हृदयविकाराच्या झटक्याचा घटनेत वाढ पाहिला मिळत आहे. अशात कोविशील्ड लसीमुळे हृदयविकाराच्या झटक्याची बाब समोर आली. त्यानंतर अख्खा देश चिंतेत आहे. 

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत श्रेयसने कोविड19 लसीमुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला का? यावर भाष्य केलं. श्रेयस म्हणाला की, 'मी धूम्रपान करत नाही, मी नियमितपणे दारू पीत नाही. मी महिन्यातून एकदा आणि मर्यादेत प्रमाणात मद्यापान करतो. माझं कोलेस्टेरॉल थोडेसं वाढले होतं, जे मला सांगितलं गेलंय की ते सामान्य असतं. मी यासाठी औषध घेत असल्याने ते बऱ्याच प्रमाणात कमी झालं होतं. मग जर मला इतर कोणताही आजार नव्हता, मला मधुमेह नाही, मला रक्तदाबाचा त्रास नाही, तर हृदयविकाराचा झटक्याचं कारण काय असू शकतं?'

अभिनेता म्हणाला  'लसीकरणानंतरच...' 

या मुलाखत पुढे तो म्हणाला की, 'हे कोरोना लसीचे दुष्परिणाम असू शकतात, असं त्याला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे कोरोना लसीसंदर्भातील ही थिअरी मी नाकारणार नाही. कोविड लसीनंतरच मला थोडा थकवा जाणवला होता. लसीनंतर काही तर शरीरात व्हायला हवं, हे आपण नाकारु शकत नाही. कारण ते कोविड आहे की लसमुळे आहे हे मला कळतं नव्हतं. कारण हे आपल्यासाठी दुर्दैवी आणि भितीदायक आहे की आपण आपल्या शरीरात काय ठेवलंय, हे आपल्याच माहिती नाही. आम्ही कंपन्यांवर विश्वास ठेवून पुढे गेलो. कोविडच्या आधी मी अशा घटना ऐकल्या नव्हत्या हेही तेवढंच खरं आहे. मला हे जाणून घ्यायचंय की लसीमुळे आपल्या शरीरात काय परिणाम केला. माझ्याकडे सर्व तथ्य आणि पुरावे असल्याशिवाय कोणतेही विधान करणे मला व्यर्थ वाटतं'