रिंकूचा साडीतला 'हा' व्हिडिओ पाहिलात का?

व्हिडिओमधील तिच्या घायाळ करणाऱ्या अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे.  

Updated: May 22, 2020, 05:57 PM IST
रिंकूचा साडीतला 'हा' व्हिडिओ पाहिलात का? title=

मुंबई : 'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. लॉकडाऊनमुळे ती स्वतःचा पूर्ण वेळ कुटुंबासोबत घालवत आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या  माध्यमातून ती नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते. शिवाय आपल्या आगामी प्रोजेक्ट संबंधी माहिती देखील ती कायम सोशल मीडियावर शेअर करत असते. लॉकडाऊनदरम्यान तिने स्वतःचा साडीतला एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. रिंकूचा हा २० मिनिटांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

व्हिडिओमध्ये तिने साडी नेसली आहे. व्हिडिओमधील तिच्या घायाळ करणाऱ्या अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे. रिंकूच्या या व्हिडिओवर असंख्य लाइक्स आणि कमेंट देखील येत आहेत. तिच्या या  आदा पाहूण एका चाहत्याने तर तिच्याकडे चक्क लग्नाची मागणी केली आहे. 'माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न करशील का?' असा थेट प्रश्न या चाहत्याने तिला विचारला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

सांगायचं झालं तर मोठ्या पडद्यावर आपली जादू दाखवल्यानंतर रिंकूची पावले वेब सीरिजकडे वळली आहेत. काही दिवसांपूर्वी रिंकूची 'हंड्रेड' ही हिंदी वेबसीरिज रिलीज झाली आहे. या सीरिजमध्ये ती अभिनेत्री लारा दत्ताबरोबर स्क्रीन शेअर करत आहे.

'हंड्रेड' या हिंदी वेबसीरिस मधील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मराठीमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करणाऱ्या रिंकूने हिंदी डिजिटल जगतामध्ये पाय रोवण्यास सुरूवात केली आहे.