मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता आदिनाथ ठाकरे आणि उर्मिला कानिटकर-ठाकरे यांच्या फॅन्ससाठी गुडन्यूज आहे. या जोडप्याच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.
आदिनाथची बायको उर्मिला प्रेग्नंट असल्याची बातमी सीएनएक्स मस्ती या वेबसाईटला दिलीये. नव्या पाहुण्याची चाहूल लागल्याने आदिनाथ चांगलाच खुश आहे.
सिनेसृष्टीतील क्यूट कपल म्हणून आदिनाथ-उर्मिला या जोडीकडे पाहिले जाते. या दोघांनी मिळून अनवट, दुभंग या सिनेमात काम केलेय. शुभमंगल सावधान या उर्मिलाच्या पहिल्या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आदिनाथ तिच्या प्रेमात पडला. २०११मध्ये हे दोघेही विवाहबद्ध झाले होते.