सेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष प्रसून जोशी, पहलाज निहलानींची हकालपट्टी

सेन्सॉर बोर्डाच्या जाचाला कंटाळलेल्या निर्माता-दिग्दर्शकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सेन्सॉर बोर्डाचे वादग्रस्त अध्यक्ष पहलाज निहलानी यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Aug 11, 2017, 08:29 PM IST
सेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष प्रसून जोशी, पहलाज निहलानींची हकालपट्टी title=

मुंबई : सेन्सॉर बोर्डाच्या जाचाला कंटाळलेल्या निर्माता-दिग्दर्शकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सेन्सॉर बोर्डाचे वादग्रस्त अध्यक्ष पहलाज निहलानी यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

आता या पदावर प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अभिनेत्री विद्या बालनलाही सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

Image result for prasoon joshi zee news

तब्बल तीन वर्ष सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेले पहलाज निहलानी हे वेगवेगळ्या कारणांनी वादात सापडले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात अनेक बॉलिवूड अभिनेते उभे ठाकले होते. त्यांच्या अनेक निर्णयांवर जोरदार टीकाही झाली होती. निहलानी यांना पदावरुन हटवण्यासाठी त्यांची आडमुठी भूमिकाही कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे सिनेक्षेत्रातूनही त्यांच्यावर वारंवार टीका सुरु होती.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहलाज निहलानी यांची हकालपट्टी निश्चित होती. त्यांच्या जागी निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश झा आणि ‘चाणक्य’ मालिकेचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश यांच्या नियुक्तीची चर्चा होती. अखेर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसून जोशी यांच्या नावाची घोषणा केली आहे.