मुंबई : 'तुला पाहते रे' या मालिकेतून स्मॉल स्क्रिनवरील एन्ट्री करणारी अभिनेत्री गायत्री दातार सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते. या मालिकेत तिने साकारलेली साधी-भोळी इशा आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. सध्या गायत्री 'चला हवा येऊ द्या' या मालिकेतून आपल्या विनोदी अभिनयाने रसिक प्रेक्षकांचं मनं जिंकते आहे.
इंस्टाग्रामवर देखील तिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे.गायत्री बऱ्याचदा तिच्या बोल्ड आणि हटके अंदाजातील फोटोशूटमुळे चर्चेत असते.
पण आता गायत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा साधा-सिंपल अंदाज सगळ्याचच लक्षवेधून घेतोय. गायत्रीने प्रिंटेट कुर्ता परिधान केला असून तिच्या गोड स्माईने सगळ्यांचच लक्षवेधून घेतलंय.
या सिंपल पण तितक्याच मनमोहक लुकमध्ये गायत्री खुपच गोड दिसतेय. 'रंग बदल बदल के क्यूँ चहक रहे हैं दिन दुपहरियां… मैं जानू ना जानू ना जानू ना जानू ना' असे कॅप्शन देत गायत्रीने हा फोटो शेअर केला आहे.
तर दुसऱ्या एका फोटोला साजेसं कॅप्शनसुद्धा गायत्रीने दिलंय 'आखोंके राज़ आंखे ही जाने… बया करती है जाने कितने फसाने..!