शाहरुखच्या घरातील मोठं सिक्रेट सर्वांसमोर; रितेश देशमुखच्या म्हणण्यावर विश्वास ठेवाल तर धक्काच बसेल

जाणून घ्या, रितेशनं कोणतं गुपीत सगळ्यांसमोर आणलं आहे. 

Updated: Oct 8, 2022, 02:29 PM IST
शाहरुखच्या घरातील मोठं सिक्रेट सर्वांसमोर; रितेश देशमुखच्या म्हणण्यावर विश्वास ठेवाल तर धक्काच बसेल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रितेश आणि बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानमध्ये (Shahrukh Khan) असलेली मैत्री तर सगळ्यांनाच ठावूक आहे. रितेश अनेकवेळा शाहरुखच्या घरी म्हणजे मन्नतमध्ये असलेल्या पार्ट्यांमध्ये हजेरी लावतो. शाहरुखच्या घरी दिवाळी पार्टी असो किंवा गेट-टूगेदर असो, मन्नतमध्ये होणाऱ्या पार्ट्यांकडे सगळ्यांचे लक्ष वेधते. पण शाहरुखच्या घरी होणाऱ्या पार्ट्यांविषयी रितेशनं एक गुपीत शेअर केलं आहे. 

आणखी वाचा : 'मला एकदा तिनं इतकं मारलं की...', जया बच्चन यांच्या रागामुळे लेकिच्या मनात भलतीच दहशत

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

समदीशच्या अनफिल्टर्ड एपिसोडमध्ये, रितेशला मन्नतबद्दल काही मनोरंजक किस्से उघड करण्यास सांगितले. त्यावेळी बोलताना रितेश म्हणाला, 'जेव्हा मन्नत येथे गेट-टूगेदर असतं तेव्हा जेवण पहाटे 3 वाजता सर्व्ह करण्याच येतं. पण मन्नतची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांचा होस्ट, जेव्हा तुम्ही पार्टीमधून घरी जाता, तेव्हा तो स्वत: तुम्हाला सोडायला गेटजवळ येतो आणि तुमच्या गाडीचा दरवाजा उघडतो आणि तो शाहरुख खान आहे.'

आणखी वाचा : Shahrukh की गौरी? दोघांमध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत कोण, पाहून विश्वासच बसणार नाही

गौरीनं (Gauri Khan) शाहरुख खान त्यांच्या पार्टीत येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला त्यांच्या कारपर्यंत सोडण्याबद्दल बोलताना 'कॉफी विथ करण सीझन 7' मध्ये म्हणाली, 'तो नेहमी पाहुण्यांना त्यांच्या कारपर्यंत सोडायला जातो. कधीकधी मला असे वाटते की तो पार्ट्यांमध्ये नाही तर बाहेर जास्त वेळ घालवतो. दुसरीकडे लोक त्याला पार्टीत शोधू लागतात. मला कधी कधी असं वाटते की आम्ही घराच्या आत नाही तर बाहेर रस्त्यावर पार्टी करत आहोत.' (Food is served at 3 am at Shah Rukh and Gauri Khan s party at Mannat reveals Riteish Deshmukh) 

आणखी वाचा : MMS व्हायरल झाला अन् दुसऱ्याच दिवशी..., मोना सिंगनं केलं 'हे' काम

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : 'त्यानं मला हॉटेलच्या रूममध्ये...', अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काऊचचा 'तो' धक्कादायक अनुभव

कामाच्या आघाडीवर, रितेश अलीकडेच रजत अरोरा दिग्दर्शित 'प्लॅन ए प्लॅन बी' चित्रपटात दिसला होता, या चित्रपटात तमन्ना भाटिया, पूनम ढिल्लन आणि कुशा कपिला यांच्याही भूमिका आहेत. तर दुसरीकडे शाहरुख लवकरच 'पठान' या चित्रपटात दिसणार आहे.