'मला एकदा तिनं इतकं मारलं की...', जया बच्चन यांच्या रागामुळे लेकिच्या मनात भलतीच दहशत

श्वेतानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Oct 8, 2022, 02:22 PM IST
'मला एकदा तिनं इतकं मारलं की...', जया बच्चन यांच्या रागामुळे लेकिच्या मनात भलतीच दहशत title=

मुंबई :  बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची लाडकी नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. नव्याचा सध्या 'व्हॉट द हेल नव्या' (What The Hell Navya) या पॉडकास्टमुळे चर्चेत आहे. या पॉडकास्टमध्ये नव्यासोबत तिची आई श्वेता बच्चन (Shweta Bachchan) आणि आजी जया बच्चनसोबत (Jaya Bachchan) दिसते. नव्या त्यांच्यासोबत गप्पा मारताना दिसते. यावेळी श्वेतानं आई जया बच्चन कशा प्रकारे मारहाण करायची याचा खुलासा केला आहे. पहिल्या मुलाला नेहमीच खूप मारलं जातं असं श्वेता यावेळी म्हणाली.

बातमीची लिंक : Shahrukh की गौरी? दोघांमध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत कोण, पाहून विश्वासच बसणार नाही

श्वेता तिच्या लहानपणीच्या आठवणी आणि extra-curricular activities मध्ये श्वेतानं सहभागी व्हावे यासाठी तिची आई भाग पाडायची या विषयी सांगत म्हणाली, 'ती एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये सहभागी होण्यास मला भाग पाडायची. मला भरतनाट्यम, हिंदी शास्त्रीय संगीत, स्विमिंग, सितार आणि पियानो शिकावं लागलं. पण ती मला सतत कानशिलात मारायची. मी खूप मार खाल्ला आहे. एकदा तर तिनं मला इतकं मारलं की माझ्यावर पट्टी तुटली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बातमीची लिंक : MMS व्हायरल झाला अन् दुसऱ्याच दिवशी..., मोना सिंगनं केलं 'हे' काम

श्वेताने हे शेअर करत असताना जया बच्चन यांनी मध्येच तिला थांबवत सांगितले की, 'अभिषेकनं क्वचितच कानशिलात मार खाल्ला असेल. मला असं वाटतं की नेहमीच पहिलं मुलं मार खातं. मला लहानपणी खूप मार खावा लागला. माझ्या बहिणींना तसं झालं नाही.' (Shweta Bachchan says mom Jaya Bachchan was very free with her slaps during her childhood) 

आणखी वाचा : 'जिसने भी उसे छोड़ा...', दयाबेन पुन्हा मालिकेत परतणार नाही? एका बड्या व्यक्तीच्या पोस्टनं चर्चांना उधाण

हे ऐकल्यानंतर आईनं असं काय केलं असेल की आजी जयानं तिला मारलं असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता नव्याला झाली. पुढे जया म्हणाल्या, 'ती खूप त्रास द्यायची आणि हट्टी होती. प्रामाणिकपणे, मला असं जाणवलं की आई-वडील जेव्हा मुलांवर रागावतात जेव्हा ते परिस्थिती हाताळण्यास असमर्थ असतात. तर, त्यावर एकच प्रतिक्रिया येते आणि निराशा अशा प्रकारे बाहेर पडते.'

आणखी वाचा : 'त्यानं मला हॉटेलच्या रूममध्ये...', अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काऊचचा 'तो' धक्कादायक अनुभव

जया या श्वेताला मारहान करायच्या तर अमिताभ त्याला विरोध करायचे. 'त्यानी दिलेली जास्तीत जास्त शिक्षा म्हणजे एका कोपऱ्यात उभे राहणे. मला ती शिक्षा आवडली कारण मी तेथे उभे राहून कथा बनवायचे आणि तिथे कोपऱ्यात स्वतःशी बोलायचे',  असे श्वेता म्हणाली.