गायिकेनं सुरेल आवाजात छेडली तान; बादलीतून पैशांची बरसात, पाहा Viral Video

या कलाकारांना त्याच तोडीनं दादही दिली जात आहे. 

Updated: Nov 19, 2021, 03:53 PM IST
गायिकेनं सुरेल आवाजात छेडली तान; बादलीतून पैशांची बरसात, पाहा Viral Video  title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : भारत हा एक असा देश आहे, जिथे कलाकारांना कायमच राजाश्रय मिळाला आहे. कमीजास्त स्वरुपात अनेक कलाकारांच्या कलेला रसिकांनी कायमच दाद दिली आहे. बॉलिवूडमधून अशाच काही कलाकारांना त्यांची कला मोठ्या समुदायापर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली आहे. 

आता यातच नव्यानं भर पडत आहे ती म्हणजे सोशल मीडियाची. 

तळागाळातील कलाकारांना सोशल मीडियामुळं त्यांची कला अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळत आहे. 

मुख्य म्हणजे या कलाकारांना त्याच तोडीनं दादही दिली जात आहे. सध्या व्हायरल होणारा एक व्हिडीओ याचीच प्रचिती देत आहे. 

 उर्वशी रादादिया (Urvashi Radadiya) या गायिकेनं इथं तिच्या कलेनं सर्वांनाच असं काही थक्क केलं, की लोकांनी तिच्यावर चक्क बादलीतून पैशांची बरसात केली. 

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये ही गायिका एक भजन गाताना दिसत आहे. तिच्या गाण्यानं एक चाहता इतका भारावून जातो की पुढे जे घडतं ते सर्वांना थक्क करणारं आहे. 

हा फॅन गायिकेवर चक्क बादलीनं तिच्यावर पैशांची बरसात करताना दिसत आहे. 

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यानं त्याच्या पेजवर हा फोटो शेअर केला आहे.

हे पैसे खरे असल्याचं कॅप्शनमध्ये लिहत त्यानंही सर्वांनाच धक्का दिला आहे. 

दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आपल्याला मिळणारी लोकप्रियता पाहता चाहत्यांच्या प्रेमासाठी या गायिकेनं सर्वांचेच आभार मानले आहेत.