अभिनेता संजय दत्तच्या बायकोसोबत लिव इनमध्ये होता 'हा' खेळाडू

अभिनेता संजय दत्तची एक्स पत्नी अनेक वर्ष लिव इन रिलेशनशिपमध्ये होती.

Updated: Nov 5, 2022, 09:25 PM IST
अभिनेता संजय दत्तच्या बायकोसोबत लिव इनमध्ये होता 'हा' खेळाडू title=

मुंबई : मनोरंजन विश्वाचं क्रीडा जगताशी नेहमीच अनोखं नातं आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी अनेक खेळाडूंसोबत लग्न केले आहे. त्याचबरोबर अनेक अभिनेत्रींचं लग्न जमत नसलं तरी त्यांच्या कोणत्याही खेळाडूसोबतच्या अफेअरच्या बातम्या समोर येतात. बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा देखील सध्या टेनिस जगतातील प्रसिद्ध खेळाडू लिएंडर पेससोबत डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे.  

लिएंडर पेस होता रिया पिल्लईसोबत रिलेशनशिपमध्ये
सध्या तरी दोघांनीही आपलं नातं अधिकृत केलेलं नाही. पण त्यांचे फोटो पाहता दोघंही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं समजतं.लक्षात घेण्यासारखं आहे की, लिएंडर पेस किम शर्माच्या आधी महिमा चौधरी आणि नंतर संजय दत्तची पत्नी आणि मॉडेल रिया पिल्लईसोबत रिलेशनशिपमध्ये होती. लिएंडर आणि रिया 10 वर्षे एकमेकांना डेट करत होते. दोघंही लिव्ह इनमध्ये राहत होते पण त्यांच्या प्रेमाचा शेवट खूप वाईट झाला. अभिनेता संजय दत्तची एक्स पत्नी अनेक वर्ष लिव इन रिलेशनशिपमध्ये होता.

रियाच्या आयुष्यात येण्यापूर्वी तो अभिनेत्री महिमा चौधरीला डेट करत होता. दोघंही जवळपास 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, रियामुळेच लिएंडरने महिमा सोडल्याचं बोललं जातं. रियामुळेच त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं महिमाने स्वतः मान्य केलं होतं.

लिएंडर पेस 2003 मध्ये पहिल्यांदा मॉडेल आणि आर्ट ऑफ लिव्हिंग ट्रेनर रिया पिल्लईला भेटला होता. जरी त्यावेळी रिया विवाहित होती. तिने 1998 मध्येच संजय दत्तसोबत लग्न केलं. असे म्हटले जाते की, संजय दत्तसोबत लग्न करतानाच ती लिएंडरच्या जवळ आली होती  तर संजय दत्तचं नावही अनेक बॉलिवूड अभिनेत्रींशी जोडलं जायचं. यानंतर त्यांचं नातं संपुष्टात आले आणि 2008 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

रियाने सांगितलं होतं की, तिने २००५ मध्ये लिएंडर पेसशी लग्न केलं होतं आणि दोघांना एक मुलगी आयना आहे. रियाने असंही सांगितलं होतं की, 2007 पूर्वी लिएंडर वर्षातून 20 दिवस घरी बसत असे. 40 दिवस तो खेळायचा आणि इतर कामात व्यस्त होता. वर्षातील 10 महिने तो घराबाहेर असायचा, पण कुठे असायचा काय करायचा याचा आम्हाला पत्ता नसायचा. दुसरीकडे, लिएंडरने रियाशी लग्न केल्याचे कधीही मान्य केलं नाही. जरी तो रिया आणि त्याच्या मुलीसोबत सर्वत्र दिसत होता.

अशा परिस्थितीत त्यांचं नातं आणखी बिघडू लागलं. त्याचवेळी रियाने लिएंडर आणि त्याच्या वडिलांवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला. पेस म्हणाला की, त्याने रियाशी कधीच लग्न केलं नाही. दुसरीकडे रियाने सांगितलं की, तिची मुलगी आयना हिला ब्रेन ट्युमर आहे आणि 2009 पासून ती एकटीच तिचं घर आणि मुलीची काळजी घेत होती.