Bhabi Ji Ghar Par Hai: अंगूरी भाभीचा बोल्ड लुक आला समोर, PHOTO पाहून चाहते थक्क

अंगूरी भाभीने ओलांडल्या सर्व मर्यादा, पहिल्यांदाच इतक्या बोल्ड अवतारात दिसली, PHOTO पाहिलेत का तुम्ही?

Updated: Nov 5, 2022, 10:43 PM IST
 Bhabi Ji Ghar Par Hai: अंगूरी भाभीचा बोल्ड लुक आला समोर, PHOTO पाहून चाहते थक्क  title=

मुंबई : Bhabi Ji Ghar Par Hai 'भाभी जी घर पर है' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंगूरी भाभी शुभांगी अत्रे (Shubhangi Atre) हीचा मोठा चाहता वर्ग आहे.अनेक प्रेक्षक अंगूरी भाभीची (Angoori Bhabi) अॅक्टींग पाहण्यासाठीच ही सिरीयल पाहत असतात. नेहमी छोट्या पडद्यावर देसी स्टाईलमध्ये दिसणाऱ्या या अंगूरी भाभीचा प्रथमच बोल्ड लुक समोर आला आहे.हा लुक पाहून चाहते थक्क झाले आहेत. 

हे ही वाचा : गायिका पलक मुच्छालच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो आले समोर, पाहा PHOTO

अंगूरी भाभी (Angoori Bhabi) म्हणजेच तुमची लाडकी शुभांगी अत्रे (Shubhangi Atre) मालिकेत देसी स्टाईलमध्ये दिसली असली तरी ती खऱ्या आयुष्यात खुपच बोल्ड आहे. तुम्हाला यावर विश्वास बसत नसेल तर तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट पाहा. या अकाऊंटवर तिने अनेक बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. 

हे ही वाचा : 'या' प्रसिद्ध बोल्ड अभिनेत्रींसमोर Urfi Javed काहीच नाही, PHOTO पाहून तुम्हालाच कळेल

फोटोत काय?

 शुभांगी अत्रेचा (Shubhangi Atre) एक फोटो खुप चर्चेत आला आहे. य़ा फोटोत ती खुपच बोल्ड लुकमध्ये दिसली आहे. फोटोमध्ये तिने एक घट्ट वन-पीस परिधान केला आहे आणि कॅमेरासमोर ती तिची बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे. 

लुकची चर्चा

या फोटोत शुभांगी अत्रे (Shubhangi Atre) शेताच्या मधोमध उभ्या राहून परफेक्ट पोज देताना दिसत आहेत. शुभांगीने पांढऱ्या रंगाचा टाइट वन-पीस परिधान केला आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी, अभिनेत्री तिचे केस उघडून हलक्या मेकअपमध्ये दिसली आहे. या फोटोत अभिनेत्री तिची परफेक्ट फिगर फ्लॉंट करत आहे. 

शुभांगी अत्रेने (Shubhangi Atre) तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करून अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये बटरफ्लाय आयकॉन शेअर केला आहे. शुभांगीने हा ग्लॅमरस लूकचा फोटो शेअर करताच चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय.