सलमान आणि शिल्पा शेट्टीविरोधात एफआयआर

सलमान खान आणि शिल्पा शेट्टी आपल्या एका विधानामूळे नव्या वादात अडकले आहेत.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 20, 2017, 04:53 PM IST
सलमान आणि शिल्पा शेट्टीविरोधात एफआयआर title=

नवी दिल्ली : सलमान खान आणि शिल्पा शेट्टी आपल्या एका विधानामूळे नव्या वादात अडकले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार सलमान आणि शिल्पाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होतोय.

यामध्ये त्यांनी जातीवाचक शब्दाचा प्रयोग केला आहे. या शब्दामूळे वाल्मिकी समाजातील लोकांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. 
 
वाल्मीकी समाज अॅक्शन कमिटीच्या दिल्ली अध्यक्षांनी पश्चिम दिल्लीच्या डीसीपींना यासंबंधी तक्रार केली आहे. या तक्रारीची कॉपी फेसबुकवर व्हायरल होत आहे. 

घोषणाबाजी आणि पोस्टर्स जाळली 

 सलमान आणि शिल्पाच्या वक्तव्याने समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. मंगळवारी राज्यस्थानच्या अजमेरमध्ये हा क्रोध पाहायला मिळाला.

अजमेर येथे सलमानविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्याचा पुतळा देखील जाळण्यात आला.

दोघे आपल्या शो मूळे चर्चेत 

सलमान आणि शिल्पा शेट्टी सध्या आपआपल्या रिअॅलिटी शोमूळे चर्चेत आहेत.

एकीकडे सलमान रिअॅलीटी टी.व्ही. शो 'बिग बॉस' होस्ट करतोय तर शिल्पा 'डान्स रिअॅलिटी शो' सुपर डान्सरमध्ये परिक्षक आहे.