सुरक्षारक्षकाचं काम करणाऱ्या कलाकाराला अखेर बॉलीवूडमधून मदतीचा हात

बॉलिवूडकरांना याची चाहूल लागताच अनेकांनी यांच्या मदतीसाठी हात पुढे सरसावला आहे. 

Updated: Mar 27, 2019, 01:41 PM IST
सुरक्षारक्षकाचं काम करणाऱ्या कलाकाराला अखेर बॉलीवूडमधून मदतीचा हात title=

मुंबई : प्रसिद्धीच्या ओघात काही व्यक्ती वाहत जातात. तसेच यशाच्या उच्च शिखरावर जावून विराजमान होतात. पण प्रत्येकाचे नशीब शेवटपर्यंत साथ देत नाही, हेही तितकेच खरे आहे. असंच काहीसं घडलं आहे बॉलिवूड अभिनेता सवी सिद्धू यांच्या सोबत. सवी सिद्धू यांनी नाइलाजास्तव सुरक्षा रक्षकाची नोकरी स्वीकारली. बॉलिवूडकरांना याची चाहूल लागताच अनेकांनी यांच्या मदतीसाठी हात पुढे सरसावला आहे. आता कलाविश्व त्यांच्या मदतीसाठी उभं राहिल्याचं पाहायला मिळत आहे. अनुराग कश्यप, अभिनेता राजकुमार राव यांच्या मागोमाग आता गायक मिका सिंग सावी सिद्धूंच्या मदतीला धावला आहे. 

गायक मिका सिंगने त्याच्या आगामी चित्रपटात सावी सिद्धूंना काम करण्याची संधी दिली आहे. महत्वाचे म्हणजे चित्रपटात अभिनेत्री बिपाशा बासु सुद्धा झळकणार आहे. भूषण पटेल यांच्या 'आदत' चित्रपटात त्यांना संधी देण्यात आली आहे. मिका सिंगने ट्विटवर एक पोस्ट केले आहे. या पोस्टमध्ये तो म्हणाला,  'मी सावी सिद्धूंना ओळखत नाही, पण मला त्यांची मदत करायची आहे.'

बॉलिवूडमध्ये सावी सिद्धूंनी अनेक चित्रपटात काम केले आहे. 'गुलाल', 'पटियाला हाऊस', 'पाँच', 'ब्लॅक फ्रायडे' या चित्रपटांमध्ये ते झळकले आहे. अचानक आजारी पडल्यामुळे ते अभिनयापासून दूर झाले होते.