'या' रेस्टॉरंटमध्ये मिळतात केवळ श्रीदेवीच्या सिनेमाच्या नावाचे पदार्थ

भारतामध्ये सिनेवेड्यांची काही कमी नाही. कलाकारांच्या प्रेमापोटी काही फॅन्स फारच आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करतात. 

Updated: Feb 8, 2018, 04:10 PM IST
'या' रेस्टॉरंटमध्ये मिळतात केवळ श्रीदेवीच्या सिनेमाच्या नावाचे पदार्थ  title=

मुंबई : भारतामध्ये सिनेवेड्यांची काही कमी नाही. कलाकारांच्या प्रेमापोटी काही फॅन्स फारच आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करतात. 

श्रीदेवीचा खास फॅन  

चेन्नईमध्ये श्रीदेवीच्या प्रेमापोटी तिच्या एका फॅनने चक्क रेस्टॉरंट उघडले आहे. या रेस्टॉरंटची खासियत म्हणजे येथे मिळणारे सारे पदार्थ केवळ श्रीदेवीच्या चित्रपटाच्या नावांवरून घेतलेले आहेत. 

बालकलाकार म्हणून सुरूवात  

श्रीदेवीच्या करियरची सुरूवात सिनेमामध्ये बालकलाकार म्हणून आली आहे. त्यानंतर हिंदी चित्रपटांमध्ये अनेक उल्लेखनीय भूमिकांमध्ये श्रीदेवी दिसली आहे. काही दिवस हिंदी सिनेमांपासून दूर गेलेली श्रीदेवी 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटातून पुन्हा रूपेरी पडद्यावर आली होती. 

100 हून अधिक डिश  

मुंबई मिररने दिलेल्या माहितीनुसार, श्रीदेवीच्या खास फॅनने तिच्यावरील प्रेमापोटी खास रेस्टॉरंट उभारलं आहे. या रेस्टॉरंटमध्ये सुमारे 100 हून अधिक पदार्थ ठेवण्यात आलेले आहेत. अनेक पदार्थांची नावं ही श्री देवीच्या हिंदी आणि साऊथ इंडियन चित्रपटावर आधारित आहेत. 

कसं आहे रेस्टॉरंट ? 

चेन्नई स्थित या रेस्टॉरंटच्या मुख्य दरवाज्यावर श्रीदेवीचे पोस्टर आहे. मालकाने श्रीदेवीला आमंत्रण दिले आहे मात्र श्रीदेवी येणार का ? याबद्दल अजूनही माहिती मिळालेली नाही. 

श्रीदेवीप्रमाणेच मुंबईत सलमान खानच्या एका चाहत्यानेही 'भाईजान' नावाचे रेस्टॉरंट सुरू केले आहे.