'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री भारतात सुरु केली पहिली व्हॅनिटी वॅन

पूनमने जवळ-जवळ ४६ वर्ष सिनेमात काम केलं. ती जवळपास ९० सिनेमा दिसली आणि नंतर सिनेसृष्टीपासून दूर गेली. 

Updated: Apr 18, 2024, 07:56 PM IST
'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री भारतात सुरु केली पहिली व्हॅनिटी वॅन title=

मुंबई : अभिनेत्री पूनम ढिल्लोने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 1978 साली 'त्रिशूल' सिनेमातून केली. यानंतर तिने 'नूरी', 'काला पत्थर', 'तवायफ', 'सोनी माहीवाल', 'कर्मा' आणि 'तेरी मेहरबानियां' सारखे हिट सिनेमा दिले. पहिला सिनेमा त्रिशूलमध्ये  पूनम ढिल्लोने स्विमशूट परिधान केला होता ज्याची चर्चा फिल्मी दूनियेत होऊ लागली. आणि जेव्हा तिच्या आईच्या कानावर लेकीच्या चित्रपटात काम करण्याची बातमी पोहोचली तेव्हा तिने अभिनेत्रीशी बोलणं बंद केलं.

पूनमने जवळ-जवळ ४६ वर्ष सिनेमात काम केलं. ती जवळपास ९० सिनेमा दिसली आणि नंतर सिनेसृष्टीपासून दूर गेली. आता पुन्हा अभिनेत्रीने सिनेमा करायला सुरुवात केली आहे. मात्र खूप कमी. पूनम ढिल्लो एक बिझनेसवुमन आहे. तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की, भारतात व्हॅनिटी वॅनची सुरुवात पूनम ढिल्लोने केली होती.

पूनमला अशी सुचली होती व्हॅनिटी वॅनची आयडिया
आधी अभिनेत्रीला शूटिंग दरम्यान भरपूर त्रास व्हायचा. आराम करायचा झाला तरी ओपन एरिआमध्ये छत्री खाली बसावं लागायचं. जर कपडे बदलायचे झाले तर किंवा वॉशरुम जावं लागलं तर झाडाच्या मागे जावं लागायचं. किंवा बसचा सहारा घ्यावा लागायचा. नाही तर पुन्हा हॉटेल जा आणि तिथून सगळ आवरुन यावं लागालयं. माधुरी दीक्षितपासून जया बच्चन आणि दिवंगत एक्ट्रेस श्रीदेवीपर्यंत शूटिंग दरमान होणाऱ्या समस्येविषयी बऱ्याचदा बोललं गेलं. तेव्हा पूनम ढिल्लोने व्हॅनिटी वॅनची कॉन्सेप्ट तिच्या डोक्यात आली.
 
तेव्हा पूनम ढिल्लोने एका बसला व्हॅनिटी वॅन बनवण्याचा विचार केला. यासाठी तिने बसमध्येच एसी लावला. आणि मेकअप रुम आणि टॉयलेटदेखील बनवला. पूनम ढिल्लोने व्हॅनिटी वॅनची आयडिया तेव्हा आली जेव्हा ती एकदा विदेशात एका सिनेमाचं शूटींग करत होती. तिथे पूनमने पाहिलं की, सेटवर स्टारजवळ एक वॅन असते ज्यामध्ये त्या ट्रेलर वॅन किंवा मेकअप वॅन म्हणायचे तेव्हा पूनम ढिल्लोने याला  वॅनिटी असं नाव दिलं.

इंडियामध्ये लॉन्च केली २५ व्हॅनिटी वॅन, नंतर खरेदी केली प्रत्येक स्टारने
पूनम ढिल्लो पहिली अभिनेत्री होती, जिने व्हॅनिटी वॅन लॉन्च केली. ती अशी पहिली अभिनेत्री होती जिच्याकडे वॅनिटी वॅन होती. पूनम ढिल्लोने १९९१ मध्ये जे ट्रेवलर्ससोबत मिळून भारतात २५ वॅनिटी वॅन लॉन्च केल्या होत्या. तेव्हा सिनेसृष्टीत बऱ्याचश्या लोकांनी वॅनिटी वॅनवर फालतू खर्च केला होता. मात्र हळू-हळू बरेच सेलिब्रिटीने वॅनिटी वॅन ठेवणं सुरु केलं.