व्हिडिओ : संजय दत्तनं तुरुंगात असल्याचं मुलांपासून असं लपवून ठेवलं...

मुंबई बॉम्बस्फोट १९९३ च्या साखळी स्फोटांनंतर संजय दत्तवर अवैध हत्यार बाळगण्याच्या गुन्ह्याखाली पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. ही शिक्षा पूर्ण करून संजय तुरुंगाबाहेर पडला असला तरी वाद काही त्याची पाठ सोडण्याचं नाव घेत नाहीय. 

Updated: Sep 16, 2017, 12:17 PM IST
व्हिडिओ : संजय दत्तनं तुरुंगात असल्याचं मुलांपासून असं लपवून ठेवलं...  title=

मुंबई : मुंबई बॉम्बस्फोट १९९३ च्या साखळी स्फोटांनंतर संजय दत्तवर अवैध हत्यार बाळगण्याच्या गुन्ह्याखाली पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. ही शिक्षा पूर्ण करून संजय तुरुंगाबाहेर पडला असला तरी वाद काही त्याची पाठ सोडण्याचं नाव घेत नाहीय. 

याच दरम्यान झी न्यूजचे एडिटर इन चीफ सुधीर चौधरी यांनी संजयसोबत साधलेल्या संवादात संजयनं आपलं मन मोकळं केलंय. 

यावेळी, संजयनं तुरुंगात काढलेले दिवस आणि आपल्या मुलांबद्दलही भाष्य केलं. 'मी तुरुंगात गेलो तेव्हा माझी मुलं २ वर्षांची होती. त्यांना एवढं आठवणार नाही... पण, मी पत्नीला सांगून ठेवलं होतं की मी स्वत: सांगितलं तरी त्यांना कधी तुरुंगात मला भेटण्यासाठी घेऊन येऊ नको... माझ्या मुलांनी मला कैद्याच्या पोशाखात आणि टोपीत पाहावं, असं मला वाटत नव्हतं. पण ते थोडे मोठे झाले तेव्हा आईला विचारतं की बाबा कुठे गेले? तेव्हा त्यांना सांगण्यात येत होतं की बाबा डोंगरावर शुटींग करत आहेत... आणि तिथं नेटवर्क नाही... तुरुंगातून मला महिन्यात दोन वेळा फोन करण्याची परवानगी मिळे... तेव्हा मी त्यांना आत्ताच डोंगरावरून खाली येत तुम्हाला फोन केलाय आणि मला परत डोंगरावर शूटिंगला जायचंय असं सांगत होतो... आता तर ते ६-७ वर्षांचे झाले आहेत. त्यांनी आता मला विचारलं की मी तुरुंगात होतो का? तेव्हा मी माझ्या पद्धतीनं त्यांना समजावलं की हो... पण, तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा मी तुम्हाला माझी कथा समजावून सांगेल...' असं म्हणताना संजय भावूक झाला होता... 

आणखी काय काय म्हटलंय संजयनं तुम्ही या व्हिडिओतूनच पाहा...