Poonam Pandey Death News: अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडेचा (Poonam Pandey) मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर आली आणि बघता बघता वेगाने व्हायरल झाली. अवघ्या 32 वर्षांच्या पूनमच्या मृत्यूने बॉलिवूडपासून तिच्या चाहत्यांपर्यंत सर्वांनासा हा मोठा धक्का होता. पण तिच्या अशा या अचानक मृत्यूने (Death News) अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याला कारण ठरलंय तिची एक मुलाखत आणि तिच्या कुटुंबियांना बाळगलेलं मौन. त्यामुळे पूनम पांडेच्या मृत्यूचं सस्पेन्स वाढलं असताना अभिनेत्रीच्या मॅनेजरनेही पूनम पांडेच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. आता पूनम पांडे जिवंत असल्याची माहिती समोर आली आहे. तिने स्वतः इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
कुठून आली मृत्यूची बातमी?
पूनम पांडेच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन (Instagram Account) एक पोस्ट करण्यात आली. यात लिहिण्यात आलं होतं 'आजची सकाळ आमच्यासाठी खूपच दु:खद आणि कठिण होती. आम्हाला हे सांगताना दु:ख होतं की आम्ही आमच्या लाडक्या पूनम पांडेला सर्वाइकल कॅन्सरमुळे (Cervical cancer) गमावलं आहे. तिच्या संपर्कात आलेले सर्व तिच्यावर खूप प्रेम करत होते. या दु:खद प्रसंगी आम्ही प्रायव्हसेची मागणी करतो'
पीआर टीमच्या पोस्टवर प्रश्न
ही पोस्ट पूनम पांडेच्या मॅनेजरने इन्स्टाग्रामवर शेअर केली. यात मॅनेजरने म्हटलंय पूनम पांडेने तिच्या होमटाऊन असलेल्या कानपूरमध्ये अंतिम श्वास घेतला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे पूनमच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांकडून किंवा पती सॅमकडून अद्याप कोणतीची प्रतिक्रिया आलेली नाही. यानिमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होतायत
- पूनम पांडेचा मृत्यू कधी झाला?
- सर्वाइकल कॅन्सरमध्ये अचानक कस मृत्यू झाला?
- कॅन्सरमुळे तिची तब्येत बिघडली होती तर दोन दिवसांपूर्वी ती शुटिंग कशी करत होती?
- पूनम पांडेवर कोणत्या रुग्णालयात उपचार सुरु होते?
- कोणत्या रुग्णालयात पूनम पांडेने अंतिम श्वास घेतला?
- पूनम पांडेवर अंतिम संस्कार कधी झाले?
शेवटच्या मुलाखतीमुळे संभ्रम
निधनाच्या बातमीदरम्यान पूनम पांडेची मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीचीच ही मुलाखत असल्याचं सांगितलं जातंय. या मुलाखतीत पूनमने केलेल्या वक्तव्यामुळे तिच्या मृत्यूबद्दल संभ्रम निर्माण झालाय. या मुलाखतीत ती म्हणतेय ' तुमच्या समोर इतकी मोठी बातमी येणार आहे की तुम्हाला सर्वांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे. लोकंना सरप्राईज द्यायला मला आवडतं. जेव्हा लोकांना वाटतं की मी सुधारतेय, त्यावेळी सरप्राईज द्यायला आणखी आवडतं, मी तुमच्या सर्वांची रिअॅक्शन पाहण्यासाठी उत्सुक आहे.'
3 दिवसांपुर्वी गोव्यात पार्टी
याशिवाय पूनम पांडेच्या आणखी एका व्हिडिओने तिच्या मृत्यूबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. पूनमने तीन दिवसांपूर्वी गोव्यातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओत ती गोव्यात पार्टी करताना दिसतेय.
रोहित शर्माच्या पोस्टने खळबळ
यादरम्यान प्रसिद्ध फॅशन डिझाईनर रोहित शर्माने केलेल्या एका पोस्टने संभ्रम निर्माण केलं आहे. रोहित शर्माने आपल्या पोस्टमध्ये पून पांडे दोन दिवसांपूर्वी मुंबईत शुटिंग करत असल्याचं म्हटलंय. त्यामुळे तिच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवणं कठिण असल्याचं त्याने म्हटलंय.