रवीना टंडनने 'या' मुलाला सेटवरुन हाकललं होतं, आज आहे बॉलिवूडचा Super Star

असं सेटवर काय घडलं की रवीना टंडनला त्या मुलाला बाहेर काढावं लागलं, बॉलिवूडचा 'तो' किस्सा पुन्हा का गाजतोय  

Updated: Nov 7, 2022, 05:13 PM IST
रवीना टंडनने 'या' मुलाला सेटवरुन हाकललं होतं, आज आहे बॉलिवूडचा Super Star  title=

Entertainment : अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tandon) बॉलिवूडमध्ये (Bollywood) अनेक सुपरहिट चित्रपट (Superhit Movie) दिले. रवीना टंडनने अभिनेत्रीने अमिताभ बच्चन, गोविंदा, अनिल कपूर, संजय दत्त ते आताचे अक्षय कुमार, अजय देवगण, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या दिग्गज अभिनेत्यांबरोबर अनेक चित्रपटात मूख्य भूमिका साकारली आहे. रवीना टंडन आता बॉलिवूडपासून काहीशी दूर आहे.

सेटवरुन काढलं होतं बाहेर
90 च्या दशकातील यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत रवीना टंडनचं नाव आवर्जुन घेतलं जातं. आता रवीना टंडन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी एक वेगळंच कारण आहे. रवीना टंडन हिच्याशी जोडला गेलेला एक किस्सा सध्या चांगलाच गाजतोय. एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान रवीना टंडनने सेटवरुन 8 ते 9 वर्षांच्या एका मुलाला बाहेर काढण्यास सांगितलं होतं. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही आज तोच मुलगा बॉलीवूडचा सुपरस्टार आहे. 

मोहरा चित्रपटातील गाण्याचं चित्रीकरण
वास्तविक रवीना टंडन आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांच्या गाजलेल्या मोहरा (Mohara) चित्रपटाशी संबंधीत हा किस्सा आहे. चित्रपटातील 'टिप टिप बरसा पाणी' गाण्याचं चित्रीकरण सुरु असताना एक लहान मुलगा आपल्या कुटुंबाबरोबर सेटवर आला होता. पण रवीनाने दिग्दर्शकाला सांगून त्या मुलाला बाहेर काढायला लावलं. हा मुलगा होता आताच सुपरस्टार रणवीर सिंग (Ranveer Singh). 

बाहेर काढण्याचं सांगितलं कारण
रवीना टंडनने दिलेल्या एका मुलाखतीत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. याबाबत तीने आपण त्यावेळी एका मुलाला बाहेर काढण्याचं मान्य केलं तसंच यावर स्पष्टीकरणही दिलं. रवीना टंडन म्हणाली लहान मुलं मला नेहमीच आवडतात, पण त्यावेळी चित्रीत होत असलेलं गाणं लहान मुलांसाठी नव्हतं. या गाण्यातील काही दृष्य आक्षेपार्ह होती आणि जी लहान मुलांसाठी योग्य नव्हती. चित्रीकरण सुरु असताना माझं त्या मुलाकडे लक्ष गेलं आणि दिग्दर्शकाला सांगून त्या मुलाला बाहेर काढण्यास सांगितलं. 

आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार
रणवीर सिंग आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे.  2010 मध्ये रणवीरने यशराज फिल्म्सच्या 'बँड बाजा बारात' सिनेमातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं आणि एका रात्रीत तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपीका पदूकोणशी लग्न करुन रणवीरने संसारही थाटला आहे.