Nysa Devgan: न्यासाने केली चेहऱ्याची सर्जरी? संतापलेल्या काजोलने ट्रोलर्सना दिलं असं उत्तर

Kajol Angry Reaction: अभिनेता अजय देवगन (Ajay Devgan) आणि काजोलच्या (Kajol) मुलीचा थक्क करणारा लूक, न्यासाने (Nyasa Devgan) सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याची सर्जरी केली?  

Updated: Nov 18, 2022, 11:33 AM IST
Nysa Devgan: न्यासाने केली चेहऱ्याची सर्जरी?  संतापलेल्या काजोलने ट्रोलर्सना दिलं असं उत्तर title=

Nysa Devgan Transformation: बॉलिवूड स्टार अजय देवगन (Ajay Devgn) आणि अभिनेत्री काजोलची (Kajol) मुलगी न्यासा (Nyasa Devgn) सध्या चांगलीच चर्चेत आहेत. अनेकदा तिचे व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसतात. आता पुन्हा एकदा ती चर्चेचा विषय ठरली आहे आणि यावेळी कारण आहे तिचा बदलेला लूक. नुकत्याच एका पार्टीत न्यासाचा ग्लॅमरस लूक (Glamorous Look) पाहून सर्वच थक्क झाले. न्यासा पूर्वीपेक्षा खूपच वेगळी आणि सुंदर दिसत होती. न्यासाचा हा लूक पाहून तिने चेहऱ्याची सर्जरी (Surgery) केली की काय, असाच प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

न्यासा स्टायलिश मुलगी
न्यासाने अद्याप बॉलिवूडमध्ये (Bollywood) एन्ट्री केलेली नाही. पण यानंतरही ती सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत असते. बी टाऊन स्टारकिड्समध्ये (Star Kids) न्यासा सर्वात स्टायलिश मुलगी असल्याचं बोललं जातं. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत असतात. सोशल मीडियावर न्यासाचे फॉलोअर्सही (Followers) हजारोत आहेत. त्यामुळे न्यासाबद्दल जाणून घेण्यात चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. आता तिचा बदलेला लूकही चाहत्यांच्या नजरेतून सुटलेला नाही.

सोशल मीडियावर न्यासा ट्रोल
तिच्या या ग्लॅमरस लूकचं काही जणं कौतुक करत आहेत. तर युजर्सने तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. इतकंच नाही तर काही युजर्सने दावाच केला आहे की न्यासाने सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याची सर्जरी केली आहे. न्यासाने कॉस्मेटिक सर्जरी (Cosmetic Surgery) आणि बोटोक्स ट्रीटमेंट (Botox Treatment) केल्याचं युजर्सचं म्हणणं आहे. पण या अफवांमुळे न्यासाची आई म्हणजे अभिनेत्री काजोल (Kajol) चांगलीच संतापली आहे. 

काजोलने दिलं ट्रोलर्सना उत्तर
एका मुलाखतीत काजोलने ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. न्यासा इंटरनेटवर खूप सक्रिय आहे आणि तिला सौंदर्य आणि आरोग्याबद्दल बरीचशी माहिती आहे. ती आठवड्यातून तीन वेळा फेस मास्क वापरते आणि मलाही ती फेस मास्क वापरण्याचा सल्ला देते. तसंच न्यासा आपल्या वडिलांसारखी फिटनेसच्या बाबतीत प्रचंड जागृक आहे. अनेकवेळा मी न्यासाकडून ब्यूटी टीप्स (Beauty Tips) घेत असल्याचं काजोलने म्हटलं आहे. 

न्यासाचे आधीचे आणि आताचे फोटो पाहिले तर मोठा फरक जाणून येईल. न्यासा आता 19 वर्षांची आहे आणि तिचे चाहते तिच्या बॉलिवूड पदार्पणाची आतुरतेने वाट पहात आहेत.