'दंगल गर्ल'च्या निधनानंतर आमिर खानचा फोन आला नाही? कारण... सुहानी भटनागरच्या आईचा खुलासा

Suhani Bhatnagar Death :  दंगल गर्ल फेन अभिनेत्री सुहानी भटनागरचं वयाच्या 19 व्या वर्षी निधन झालं. सुहानीला डर्मेटो मायोसाइटिस नावाचा आजार झाला होता. अनेक रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. पण तिच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. अखेर कमी वयात तीने जगाचा निरोप घेतला.

राजीव कासले | Updated: Feb 19, 2024, 07:53 PM IST
'दंगल गर्ल'च्या निधनानंतर आमिर खानचा फोन आला नाही? कारण... सुहानी भटनागरच्या आईचा खुलासा title=

Suhani Bhatnagar Death : बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या दंगल (Dangal) या चित्रपटाती छोट्या बबीताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुहानी भटनागरचं (Suhani Bhagnagar) शनिवारी निधन झालं. ती अवघ्या 19 वर्षांची होती. सुहानी दिल्लीतल्या सेक्टर 17 मध्ये आपल्या आई-वडिलांसोबत राहात होती. सुहानीचा मृत्यू दिल्लीच्या एम्स रुग्णालयात झाला. दोन महिन्यापूर्वी सुहानीचा हाताला सूज आली आणि तिच्या शरीरावर लाल चट्टे उमटले. सुरुवातीला हे सामान्य वाटत होतं, पण यानंतर सुहानीला इन्फेक्शन झालं आणि शरीरात पाणी जमा झालं. उपचारादरम्यन तिचा मृत्यू झाला. 

आमिर खानचा फोन आला नाही
अभिनेत्री सुहाना भटनागरच्या अचानक जाण्याने बॉलिवूड शोककळा पसरली आहे. दरम्यान सुहानीच्या मृत्यूनंतर आमिर खानचा (Aamir Khan) फोन आला नव्हता असा खुलासा तिच्या आईने केला आहे. वास्तविक सुहानीच्या आजारपणाबद्दल आमिर खानला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती, असं तिच्या आईने सांगितलं आहे. आमिर खान हे एक चांगलं व्यक्तीमत्व आहे. सुहानी आणि आमच्या कुटुंबाच्या तो खूप जवळचा होता. सुहानी आणि आमिर खानचं फोनवरुन दररोज बोलणं व्हायचं, पण तिच्या आजारपणाबद्दल आम्ही आमिरा काही सांगितलं नव्हतं. कारण आम्ही खूप तणावात होतो, असं सुहानीच्या आईने सांगितलं. 

आमिर खानने आपली मुलगी आयरा खानच्या लग्नालाही सुहानीला आमंत्रित केलं होतं. पण आजारपणामुळे सुहाना उपस्थित राहू शकली नाही. सुहानाच्या आजारपणाबद्दल कळलं असतं तर आमिर खान नक्कीच मदतीला पुढे आला असता असंही सुहानाच्या आईने स्पष्ट केलं आहे. 

दंगल गर्ल नावाने प्रसिद्ध
सुहान भटनागरने वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी दंगल चित्रपटात काम केलं. तिची भूमिका खूप गाजली. 1000 मुलींमधून सुहानीची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती. दंगल चित्रपटात सुहानीने आमिर खानच्या छोट्या मुलीची भूमिका साकारली होती. अनेकांनी सुहानीच्या कामाचं कौतुक केलं. इतकंच नाही तर लोकं तिला दंगल गर्ल नावाने ओळखू लागले. सुहानीला मॉडलिंग आणि अभिनयात रुची होती. सुहानीला अभिनय क्षेत्रात आपली कारकिर्द करायची होती. पण त्याआधी तीने शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. 

सुहाना मास कम्युनिकेशनचं शिक्षक घेत होती. फरीदाबादमधल्या मानव रचना शिक्षण संस्थेतीत दुसऱ्या वर्गात शिकत होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनयात कारकिर्द करण्याचं तीने स्वप्न पाहिलं होतं. पण हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. त्याधीच तीने जगाला अलविदा केला. सुहानीच्या निधनाने तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या मुलीने लहान वयात कुटुंबाचं आणि फरीदाबादचं नाव रोशन केल्याचा तिच्या कुटुंबियांना अभिमान आहे.