VIDEO : या तरुणीनं आपल्या डान्सनं जिंकलीत प्रेक्षकांची मनं!

सध्या इंटरनेटवर ‘तेरी खैर मंगदी’ गाण्यावर एका मुलीने केलेल्या नृत्याचा व्हिडिओ वायरल झालाय. 

Updated: Jul 14, 2017, 05:54 PM IST
VIDEO : या तरुणीनं आपल्या डान्सनं जिंकलीत प्रेक्षकांची मनं! title=

मुंबई : सध्या इंटरनेटवर ‘तेरी खैर मंगदी’ गाण्यावर एका मुलीने केलेल्या नृत्याचा व्हिडिओ वायरल झालाय.

कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्राचा ‘बार बार देखो’ या चित्रपटातलं हे गाणं चांगलंच लोकप्रिय ठरलं होतं. अनेकांनी या गाण्यातील डान्स स्टेप फॉलो करून स्वत:चे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केलेत. हा व्हिडिओ २५ लाखांच्यावर बाघितला गेला.  

 I:V Dance नावाच्या एका यू ट्यूब चॅनलवर अपडलोड करण्यात आलेला याच गाण्यावरचा डान्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला दिसतोय. या व्हिडिओमध्ये वीणा बाबू या तरुणीचं नृत्यही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय. या व्हिडिओला २५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेत. 

‘तेरी खैर मंगदी’ गाण्यावर त्या मुलीने दमदार प्रदर्शनचं केलं नाही तर तिच्या अनेक मुव्हजनंही लोकांची मनं जिंकलीत.

 

(साभार- यूट्यूब)