Pathaan : किंग खान शाहरुखच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) अनेक रेकॉर्ड रचले आहेत. या चित्रपटाने अवघ्या चार दिवसात भारतात 250 कोटी तर जगभरात 400 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन चार दिवस उलटूनही प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद या चित्रपटाला मिळतोय. जवळपास प्रत्येक शो हाऊसफूल (House Full) सुरु आहे. पठाण चित्रपटाने पहिल्या दिवशी 54 कोटींची करत बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड रचला आहे. आतापर्यंत कोणत्याही चित्रपटाला इतकी मोठी सुरुवात मिळालेली नाही. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अनेक वाद निर्माण झाले, पण या वादाचा चित्रपटाच्या लोकप्रियतेवर परिणाम जाणवला नाही.
डेव्हिडि वॉर्नरने साकारली भूमिका
देशभरातील अनेक दिग्गजांनी पठाणचं कौतुक केलं आहे. या यादीत आता ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट डेव्हिड वॉर्नरचाही (David Warner) समावेश झाला आहे. सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Account) एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत वॉर्नर पठाणच्या रुपात दिसत आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट पठाणमधले काही सीन त्याने फिल्टर केले असून त्यात शाहरुख खानच्या जागी स्वत:चा चेहरा लावला आहे.
व्हिडिओ शेअर करत त्याने एक पोस्टही लिहिली आहे. यात त्याने म्हटलंय, व्वा.. काय चित्रपटे आहे. याबरोबरच त्याने #legend आणि #icon हे हॅशटॅग जोडले आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरने म्हटलं तू पठाण सारखाच डॅशिंग दिसतोयस, तर एका युजरने म्हटलंय, केंद्र सरकारने वॉर्नरला भारतीय नागरिकत्व द्यावं. वॉर्नरचं बॉलिवूड चित्रपटावरंच प्रेम जगजाहीर आहे. याआधीही वॉर्नरने अनेक बॉलिवूड गाण्यांवर रिल्स बनवले असून ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.
पठाणचा जगभरात डंका
पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. अवघ्या चार दिवसात या चित्रपटाने 400 कोटींचा टप्पा पार केला आहे. सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून चित्रपटात शाहरुख खानबरोबरच दीपिका पदुकोन (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रटाचं प्रमुख आकर्षण म्हणजे सुपरस्टार सलमान खान. सलमान खान या चित्रपटात पाहुणा कलाकार असून त्याच्या एन्ट्रीला लोकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय.पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावरुन बराच वाद निर्माण झाला होता.