Anant-Radhika Pre-Wedding : देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant Ambani-Radhika Marchent) लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. त्याआघी प्री-वेडिंग सोहळा (Pre Wedding) पार पडणार आहा. या सोहळ्यात देश-विदेशातील अनेक दिग्गज उपस्थित राहाणार आहेत. 1 ते 3 मार्च 2023 दरम्यान अनंत-राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा रंगणार आहे. अनंत आणि राधिका यांचा 12 जुलै 2024 ला विवाह संपन्न होणार आहे.राधिका ही विरेन मर्चंट यांची मुलगी आहे. जमानगरच्या रिलायंस ग्रीन्स कॉम्प्लेक्समध्ये प्री-वेडिंग सोहळा रंगणार आहे.
अनेक दिग्गज उपस्थित राहाणार
अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यात मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक मार्क झुकरबर्ग, ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक, ब्लॅकस्टोनचे अध्यक्ष स्टीफन श्वार्जमॅन, डिज्नीचे सीईओ बॉब इगर, बँक ऑफ अमेरिकाचे सीईओ ब्रायन थॉमस उपस्थित राहाण्याची शक्यता आहे.
याशिवाय कतारचे मोहम्मद बिन अब्दुल रहमान, एडनॉकचे सीईओ सुलताना अहमद अल जाबेर, एल रोथ्सचाइल्डचे अध्यक्ष डी रोथ्सचाइल्ड भूतानचं शाही कुटुंब यांच्या नावाचीही चर्चा आहे.
शाहरुख करणार परफॉर्म
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यात बॉलिवूडचे अनेक कलाकारही सहभागी होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सोहळ्यात बॉलिवूडचा किंग खान शाहरुख (Shah Rukh Khan) स्टेज परफॉर्मन्स करणार आहे. याच्या तयारीसाठी शाहरुख जानगरमध्ये पोहोचला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात शाहरुख आपल्या टीमसह जामनगर एअरपोर्टवर दिसतोय.
Nation's Heartthrob, #ShahRukhKhan spotted at Jamnagar airport last evening pic.twitter.com/AtVX1dfp87
— Shah Rukh Khan Warriors FAN Club (@TeamSRKWarriors) February 22, 2024
आलिया आणि रणबीरही करणार डान्स
शाहरुख खान शिवाय रणबीर कपूर आणि आलिया भट्टही डान्स करणार असल्याची चर्चा आहे. गेल्या आठवड्यात हे जोडपं जामनगरमध्ये डान्सच्या तालिमीसाठी गेले होते. अंबानी फॅन पेजवर याचा एक व्हिडिओही शेअर करण्यात आला होता. रणबीर आणि आलिया अंबानी यांच्या जामनगर इथल्या फॉर्म हाऊसमध्ये दिसले होते. याशिवाय अरिजीत सिंग आणि प्रीतमही परफॉर्म करणार आहेत.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचं 12 जुलैला मुंबईत लग्न होणार आहे. बॉलिवूडबरोबर क्रिकेट क्षेत्रातील अनेक खेळाडूही या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. पाहुण्यांसाठी अहमदाबादमधील पाच स्टार हॉटेल्स बूक करण्यात आली आहेत. याशिवाय रिलायन्स टाऊनशिपमध्येही राहाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पाहुणए मुंबईहून जामनगरला हवाईमार्गे पोहोचतील.