Sonam-Anand Baby Name: अभिनेत्री सोनम कपूरने जाहीर केलं बाळाचं नाव, अर्थ आहे खूपच खास

सोनमने कपूरने पोस्ट केला मुलाचा पहिला फोटो, सांगितलं बाळाचं नाव

Updated: Sep 20, 2022, 08:12 PM IST
Sonam-Anand Baby Name: अभिनेत्री सोनम कपूरने जाहीर केलं बाळाचं नाव, अर्थ आहे खूपच खास title=

Sonam-Anand Baby Name: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने (Sonam Kapoor) काही दिवसांपूर्वी एका गोंडस लेकाला जन्म दिला आहे. सोनमने 20 ऑगस्ट रोजी ही गुड न्यूज दिली होती. त्यानंतर चाहते सोनम कपूरच्या मुलाची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. आईबाबा बनल्यानंतर सोनम आणि आनंद अहुजा प्रचंड (Anand Ahuja) आनंदी आहेत. ते सतत सोशल मीडियावरुन आपला आनंद व्यक्त करत असतात.

आता सोनम कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram) एक फॅमेली फोटो शेअर केला आहे. या फोटोत सोनम कपूर, आनंद अहूजा आणि त्यांचं बाळ दिसत आहे. या फोटोत तिघांनी मॅचिंग रंगाचे कपडे घातले आहेत. या फोटोत अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी त्यांच्या मुलाची चाहत्यांना पहिली झलक दाखवली आहे.  सोनम आणि आनंद यांच्या बाळाला आज एक महिना पूर्ण झालाय.

सोनमचे चाहते तिच्या मुलाच्या नावाची आतुरतेने वाट पहात आहेत. आज अखेर त्याच्या एक महिन्याच्या वाढदिवशी, सोनम आणि आनंदने त्यांच्या लहान मुलाचे नाव  सांगितलं आहे.  सोनमने इंस्टाग्राम पोस्टमध्ये आपल्या बाळाच्या नावाचा खूपच सुंदर अर्थ सांगितलं आहे. सोनमने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, त्याने आपल्या जीवनात नवीन अर्थ आणला आहे. भगवान हनुमान आणि भीम यांच्या रूपात हा आमच्या सामर्थ्याचे व धैर्याचे प्रतीक आहे.  हिंदू धर्मग्रंथांमध्ये वायू हा पंच तत्वांपैकी एक आहे. या दोघांनी मुलाचे नाव 'वायू' असं ठेवलं आहे.

सोनम कपूरने हा फोटो पोस्ट करत मुलाचं नाव वायू कपूर आहुजा ठेवल्याचे चाहत्यांना सांगताच चाहत्यांनी कमेंट तिचं अभिनंदन करण्यास सुरुवात केली. सोनम कपूरचे वडील आणि अभिनेता अनिल कपूर यांनीही प्रतिक्रिया व्यक्त करत लाल हार्ट इमोजी आणि स्माईली इमोजी कमेंट केलं आहे. बॉलिवूडमधील सर्व सेलिब्रिटींनी वायु आणि त्याच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत.