'एवढा कसला माज...', एल्विश यादवनं एका व्यक्तिला कानशिलात लगावताच नेटकऱ्यांचा संताप

Elvish Yadav : एल्विश यादवनं चालता-चालता एक अनोळखी व्यक्तीला लगावली कानशिलात, व्हिडीओ व्हायरल

दिक्षा पाटील | Updated: Feb 12, 2024, 11:14 AM IST
'एवढा कसला माज...', एल्विश यादवनं एका व्यक्तिला कानशिलात लगावताच नेटकऱ्यांचा संताप title=
(Photo Credit : Social Media)

Elvish Yadav : लोकप्रिय भारतीय यूट्यूबर, स्ट्रीमर आणि सिंगर एल्विश यादवला सगळेच ओळखतात. गुरुग्रामचा राहणारा हा एल्विश कायम चर्चेत असतो. यूट्यूबवर असलेल्या कॉन्टेटमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. एल्विश तर बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनचा विजेता देखील ठरला होता. सध्या एल्विश एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. त्यानं जयपुरमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्तीला कानशिलात लगावली आहे. रिपोर्ट्सनुसार, एका अनोळखी व्यक्तीनं एल्विश यादवच्या कुटुंबावर कमेंट केली. त्यानंतर एल्विशला संतापला होता. 

रविवारी संध्याकाळी 26 वर्षीय एल्विश यादवनं जयपुरमधील एका रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्तीला कानशिलात लगावली होती. रिपोर्ट्सनुसार, हे समोर आलं की एका अनोळखी व्यक्तीनं एल्विशच्या कुटुंबावर कमेंट करताच त्याला संताप आला आणि रागाच्या भरात एल्विशनं त्या व्यक्तीला कानशिलात लगावली. ही संपूर्ण घटना जयपूरमधल्या एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये हे सगळं घडलं. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र, एल्विश यादवनं कोणाला कानशिलात लगावली हे समोर आलेलं नाही. हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी पोलिस अधिकारी त्या घटनास्थळी पोहोचले. एल्विश यादवच्या पीआर टीमनं आतापर्यंत यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, एल्विशचं स्टेटमेंटची ऑडियो क्लिप व्हायरल होतेय. 

काय म्हणाला एल्विश?

जी क्लिप व्हायरल होतेय त्यात एल्विश बोलताना दिसतोय की 'हे बघ भावा, मला भांडण करण्याची काही हौस नाही, त्याशिवाय कोणाला मारण्याची देखील इच्छा नव्हती. मला सामान्य लोकांसारखं रहायला आवडतं मी फक्त माझ्या कामाशी काम ठेवतो. ज्याला फोटो काढायचो असतो त्याच्यासोबत फोटो काढतो. त्यातही तुम्ही पाहिलंत की सोबत पोलिस देखील आहेत आणि कमांडोपण आहेत, त्यांना पण चिंता आहे आहे की काही चुकीचं झालं तर काही कळणार नाही. पण जर कोणी मला आई-बहिणीवरून शिवीगाळ केलं, तर मी सोडणार नाही. त्यानं मला शिवीगाळ केली आणि मी त्याला कानशिलात लगावली. त्यानं शिवीगाळ केली तर मी त्याला लगावली. माझी स्टाईल वेगळी आहे. ते लोक तोंडानं बोलतात आणि आम्ही तोंडानं बोलत नाही.' 

हेही वाचा : दुसऱ्या लग्नानंतर तिसऱ्याच महिन्यात माहिरा खान देणार Good News? 'त्या' पोस्टमुळे चर्चा

दरम्यान, एल्विशची व्हायरल क्लिप पाहता नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केलं आहे. एक नेटकरी म्हणाला, 'काहीही कारण असलं तरी त्यानं असं कानशिलात द्यायला नको होती.' तर एक नेटकरी म्हणाला, 'एवढा माज कसला?'