Drishyam 2 Collection Day 3 : 'ब्रह्मास्त्र' नंतर 'दृश्यम 2' बदलणार बॉलिवूडचं भविष्य!

Drishyam 2 Box Office Collection Day 3: अजय देवगण चा चित्रपट Drishyam 2 चित्रपट प्रदर्शनानंतर करतोय बक्कळ कमाई, आता पर्यंत कमावले इतके कोटी 

Updated: Nov 21, 2022, 11:12 AM IST
Drishyam 2 Collection Day 3 : 'ब्रह्मास्त्र' नंतर 'दृश्यम 2' बदलणार बॉलिवूडचं भविष्य! title=

Drishyam 2 Box Office Collection Day 3 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. नुकताच अजयचा 'दृश्यम 2' (Drishyam 2) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अजयच्या 'दृश्यम 2' ला चित्रपटला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. खरंतर चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या 3 दिवसांमध्येच चित्रपट सुपरहिट ठरला आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी 'दृश्यम 2' नं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 

चित्रपटाच्या अडव्हान्स बुकिंगमध्ये 'दृश्यम 2' ने शनिवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रिपोर्ट्सनुसार, पहिल्या दिवसाच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी 'दृश्यम 2' च्या कमाईत चांगलीचवाढ झाली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाची कमाई 14.5 कोटींच्या आसपास होती. दुसरीकडे, दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाने २१.५९ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली. तिसर्‍या दिवशी म्हणजे रविवारी चित्रपटाच्या कलेक्शन पाहता सगळ्यांना धक्का बसला आहे. सॅकनैकनं दिलेल्या वृत्तानुसार, तिसऱ्या दिवशी चित्रपटानं 26.70 कोटींची कमाई केली आहे. फक्त तीन दिवसात चित्रपटानं 60 कोटींच्या जवळपास कमाई केली आहे.

हेही वाचा : Ajay Devgn रचतोय विक्रमावर विक्रम; आता तर अभिनेत्याने मोडले सर्व रेकॉर्ड

'ब्रह्मास्त्र' चित्रपटानंतर 'दृश्यम 2' हा या वर्षातील दुसरा असा हिंदी चित्रपट ठरला आहे, ज्यानं प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 60 कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. दिग्दर्शक अभिषेक पाठकनं 'दृश्यम 2' पहिल्या वीकेंड पर्यंत 45 ते 50 कोटींचा गल्ला करू शकतो असा अंदाज वर्तवला होता. मात्र, चित्रपटानं त्यांच्या अपेक्षे पेक्षा जास्त कमाई केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'दृश्यम 2' हा 2015 मध्ये आलेल्या 'दृश्यम' चित्रपटाचा सिक्वेल आहे. 'दृश्यम 2' ने पहिल्याच दिवशी आपल्या कमाईने हे सिद्ध केले आहे की 7 वर्षांनंतरही विजय साळगावकर आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल लोकांची क्रेझ कमी झालेली नाही. यावेळी अक्षय खन्नाही चित्रपटात या प्रकरणाची चौकशी करताना दिसला आहे. अक्षय खन्नाने नेहमीप्रमाणेच आपल्या अभिनयाने लोकांना प्रभावित केले.