Shah Rukh Khan चा 'मन्नत' हिऱ्यांनी सजला; अभिनेत्याच्या भव्य घरात मोठा बदल

शाहरुखच्या 'मन्नत' मध्ये मोठा बदल; पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यांवर बसणार नाही विश्वास  

Updated: Nov 21, 2022, 10:39 AM IST
Shah Rukh Khan चा 'मन्नत' हिऱ्यांनी सजला; अभिनेत्याच्या भव्य घरात मोठा बदल title=

Shah Rukh Khan bungalow Mannat :  अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) चं नाव जरी समोर आलं तरी चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असतं. मोठ्या कालावधीपासून अभिनेता मोठ्या पडद्यापासून दूर आहे तरी देखील त्याची चर्चा मात्र सर्वत्र होत असते. अभिनेत्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात कोणते बदल होत आहेत, याकडे चाहत्यांची करडी नजर असते. आता देखील शाहरुखच्या राहत्या बंगल्यात मोठा बदल झाला आहे. (Shah Rukh Khan life style)

'मन्नत'च्या नावाची पाटी

शाहरुखचा बंगला 'मन्नत'च्या नावाची पाटी (srk house mannat) बदलण्यात आली आहे. सध्या 'मन्नत'च्या नव्या नावाच्या पाटीचा व्हिडीओ ट्विटरवर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हिऱ्यांनी सजलेली नावाची पाटी दिसत आहे. याआधी देखील मन्नतच्या नावाची पाटी अनेकदा बदलली होती. (mannat shahrukh khan house)

पण आता हिऱ्यांनी जडलेली नावाची पाटी पाहून तुमच्याही डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. Shah Rukh Khan Universe Fan Club या ट्विटर अकाउंटवरुन मन्नतच्या नव्या नावाच्या पाटीचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.  पाहा व्हिडीओ... 

शाहरुख खानचे चाहते...
अभिनेता शाहरुख खानच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्याला भेटण्यासाठी त्याचा प्रत्येक चाहता प्रचंड उत्सुक असतो. एवढंच नाही तर अभिनेत्याची एक झलक पाहाण्यासाठी चाहते मुंबईतील त्याच्या 'मन्नत'बाहेर उभे असतात. (shahrukh khan mannat haunted)

शिवाय शाहरुखच्या बंगल्याबाहेर 'मन्नत' म्हणून नावाची पाटी लागली आहे. त्या नावाच्या पाटी समोर उभे राहून देखील चाहते फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. पण ज्या 'मन्नत'बाहेर चाहते फोटो काढयचे त्या नावामध्ये मोठा बदल झालेला आहे. (shahrukh khan social media)

वाचा : लग्न न करताच प्रसिद्ध अभिनेत्री प्रेग्नेंट? 'त्या' फोटोंमुळे सत्य समोर

शाहरुखच्या 'मन्नत'बंगल्यात झालेला बदल सध्या ट्विटरवर ट्रेंड होत आहे. शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्याची पाटी बदलली आहे. फोटो व्हायरल होताचं अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहे. एवढंच नाही तर शाहरुखचा बंगला 'मन्नत'च्या आधीच्या पाट्या देखील समोर आल्या आहेत.