Virat Kohli च्या स्वप्नातील घर, अनुष्कासोबत वामिकाचा खास फोटो समोर

विराट कोहलीसाठी स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे..., अनुष्कासोबत वामिकाचा खास फोटो शेअर करत म्हणाला...   

Updated: May 12, 2022, 08:23 AM IST
Virat Kohli च्या स्वप्नातील घर, अनुष्कासोबत वामिकाचा खास फोटो समोर  title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या उत्तम खेळीमुळे कायम चर्चेत असतो. पण अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केल्यानंतर विराट बि-टाऊनमध्ये देखील एका हिरोपेक्षा कमी नाही. विराट आणि अनुष्काच्या कायम चर्चा रंगत असतात. विराट आणि अनुष्का सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करतात.

विराट आणि अनुष्काच्या लग्नानंतर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. दोघांना एक मुलगी देखील आहे. तिचं नाव वामिका असं आहे. पण विराट आणि अनुष्काने मुलीची एकही झलक अद्याप दाखवलेली नाही. 

पण आता एक चित्र रेखाटत विराटने वामिकाची एक झलक दाखवली आहे. सध्या विराटने काढलेलं चित्र तुफान व्हायरल होत आहे. या चित्रात विराट, अनुष्का आणि त्यांची मुलगी वामिका दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये विराट अनेक प्रश्नांची उत्तरे देत आहे. त्याचवेळी त्याला एक कागद आणि पेन देऊन स्वातंत्र्याचा अर्थ विचारला जातो. ज्याचं तो खूप छान पद्धतीने उत्तर देतो.

विराट कोहलीसाठी स्वातंत्र्य म्हणजे डोंगरात कुठेतरी घर असायला हवं. अनुष्का आणि वामिकासोबत नदीकाठी आरामात वेळ घालवणं. हे स्वप्न विराटने कागदावर रेखाटलं. त्याचबरोबर विराटची ही ड्रीम हाउसची कल्पना चाहत्यांना आवडली आहे.