या सिनेमाचं टायटल अमिताभ यांना कधीच योग्य वाटलं नाही, पण हा सिनेमा गाजला...

'डॉन का इंतजार ११ मुल्कों की पुलिस कर रही है' हा डायलॉग कोण विसरेल.

Updated: May 12, 2021, 10:32 PM IST
या सिनेमाचं टायटल अमिताभ यांना कधीच योग्य वाटलं नाही, पण हा सिनेमा गाजला... title=

मुंबई : 'डॉन का इंतजार ११ मुल्कों की पुलिस कर रही है' हा डायलॉग कोण विसरेल. 1978 मध्ये रिलीज झालेल्या अमिताभ बच्चन यांचा ब्लॉकबस्टर फिल्म डॉनचा हा प्रसिद्ध डायलॉग आहे. 70च्या दशकात तयार झालेल्या डॉनने अमिताभ बच्चन यांच्या एंग्री यंग मॅन या भूमिकेला उंचीच्या शिखरावर नेवून ठेवलं. पण तुम्हाला माहिती आहे का? की जेव्हा अमिताभ यांनी चित्रपटाचे डॉन हे टायटल ऐकलं तेव्हा त्यांना ते अंडरगर्मेंटचे नाव वाटलं होतं.

आज 12 मे रोजी डॉन या सिनेमाला ४३  वर्षे पूर्ण झाली आहेत, या खास प्रसंगी तुम्हाला आम्ही अमिताभ यांना झालेल्या गैरसमजांची एक मजेदार किस्सा सांगणार आहोत

अमिताभ यांनी काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीमध्ये हा किस्सा शेअर केला होता. बिग बी यांनी लिहिलं की, या सिनेमाचं नाव 'डॉन' असं होतं जे मार्केटमध्ये कोणालाच मंजूर नव्हतं. बीग बींना या टायटलचा अर्थ कधीच समजला नाही. हिंदी सिनेमाच्या टायटलसाठी 'डॉन' सारखं नाव ठेवणं त्यांना कधीच योग्य वाटलं नाही.

प्रसिद्ध बनियान ब्रँडचं नाव होतं
बिग बी यांना चित्रपटाचं टायटल अंडरगारमेंट ब्रँडसारखं वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, "त्यावेळी एका प्रसिद्ध बनियान ब्रॅन्डचं नावही 'डॉन' असं होतं. जेव्हा लोक त्या ब्रँन्डच्या बनियान घालत असत, तेव्हा हे टायटल त्यांना बनियान ब्रँड सारखंच वाटलं होतं. त्यामुळे अंडरगार्मेंटचं नाव चित्रपटाला देण्यासाठी ते घाबरले होते.
 
गॉडफादर' मालिकेमुळे 'डॉन'ची लाट आली
'डॉन' ची लाट 'गॉडफादर' या मालिकेमुळे आली. त्या काळातील लोकप्रिय 'गॉडफादर' मालिकेमुळे 'डॉन' शब्दाला प्रसिद्धी मिळाली असंही अमिताभ यांनी सांगितलं. रिलीज झाल्यानंतर सिनेमा बॉक्सऑफिसवर हिट झाला. हा सिनेमा डॉन या नावामुळेच हिट झाला असंही ते म्हणाले होते.

अमिताभ बच्चन व्यतिरिक्त या सिनेमांत जीनत अमान, प्राण, हेलेन, ओम शिवपुरी आणि सत्येंद्र कपूर हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसले होते शाहरुख खानने देखील याच नावाने या सिनेमाचा रिमेक बनवला होता. शाहरुखचा हा सिनेमा 'डॉन 2' या नावाने रिलीज झाला.