Karisma Kapoor Wedding Bells : रणबीरच्या लग्नात असं काय घडलं ज्यामुळे सुरू झाली करिश्माच्या लग्नाची चर्चा

रणबीर-आलियाच्या विवाह सोहळ्यात असंकाही घडलं ज्यामुळे करिश्मा पुन्हा बोहल्यावर चढणार का असा सवाल तिचे चाहते विचारतायत

Updated: Apr 16, 2022, 09:18 PM IST
Karisma Kapoor Wedding Bells : रणबीरच्या लग्नात असं काय घडलं ज्यामुळे सुरू झाली करिश्माच्या लग्नाची चर्चा title=

मुंबई :  रणबीर आलियाच्या लग्नाला दोन दिवस झाले मात्र त्यांच्या लग्नातल्या एक-एक रंजक चर्चा सुरूच आहेत. या शाही विवाह सोहळ्याचा थाटच असा होता तर चर्चा तर होणारच ना..रणबीर-आलियाचं लग्न तर झालं मात्र लग्नानंतर करिश्मा कपूरच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याचं कारणही ठरलंय रणबीरचं लग्न. या विवाह सोहळ्यात असंकाही घडलं ज्यामुळे करिश्मा पुन्हा बोहल्यावर चढणार का असा सवाल तिचे चाहते विचारतायत.

रणबीरची बहीण आणि अभिनेत्री करिश्मा कपूरने रणबीर-आलियाच्या लग्नातला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय, ज्यामुळे तिचे चाहत्यांनाही खरंच करिश्मा दुसरं लग्न करणार का असा प्रश्न पडला आहे. तर
झालं असं की, लग्न सोहळ्यादरम्यान आलियाचा कलिरा करिश्माच्या डोक्यावर पडल्याने आता करिश्माच्या डोक्यावर अक्षता पडणार का याची चाहत्यांना उत्सुकता आहे.. 

पंजाबी प्रथेनुसार वधू चुडा आणि कलिरा हातात घालते आणि त्यानंतर आपल्या बहिणी आणि मैत्रिणींच्या डोक्यावर ते हलवते आणि असं मानलं जातं की ज्याच्या डोक्यावर हा कलिरा पडतो त्याचं लवकरच लग्न होणार आहे.

आलियाने घातलेला कलिरा करिश्माच्या डोक्यावर पडला आणि हाच कलिरा घेतलेला फोटो करिश्माने सोशल मीडियावर शेअर केला आहे. इंस्टाग्राम VS रियलिटी असं लिहिलेल्या या फोटोमध्ये करिश्माच्या चेहऱ्यावरील हावभावही बरंच काही सांगून जात आहेत. त्यामुळे करिश्मा खरंच दुसऱ्या लग्नासाठी उत्सुक असल्याचं दिसतंय. त्यामुळे रणबीरनंतर कपूर घराण्यात पुढचं लग्न करिश्माचं असेल का याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

पाली हिलमध्ये असलेल्या वास्तू बंगल्यात रणबीर-आलियाचा शाहीविवाह सोहळा पार पडला. ज्यात अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली.