धक्कादायक : 'काही लोकांनी मला नको तिथे स्पर्श केला, पण मी थांबवू शकले नाही, कारण ते ...'

सोनाक्षी सिन्हा हे बॉलिवूड जगतातील एक मोठं नाव आहे

Updated: Apr 16, 2022, 08:41 PM IST
धक्कादायक : 'काही लोकांनी मला नको तिथे स्पर्श केला, पण मी थांबवू शकले नाही, कारण ते ...' title=

मुंबई : सोनाक्षी सिन्हा हे बॉलिवूड जगतातील एक मोठं नाव आहे. सोनाक्षी सिन्हाकडे आज कशाचीही कमी नाही कारण तिने काही वर्षात बॉलीवूडला हिट चित्रपट दिले आहेत. सोनाक्षी सिन्हाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानसोबत केली होती आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

या चित्रपटामुळे सोनाक्षी सिन्हाला इतकी ओळख मिळाली की, यामुळे ती संपूर्ण चित्रपटसृष्टीत ओळखली जाते. सोनाक्षी सिन्हा सध्या चर्चेचा विषय बनली आहे. याचं कारण नुकतंच सोनाक्षी सिन्हाचं एक  विधान समोर आलं आहे.

स्वतः सोनाक्षी सिन्हाने सांगितली तिची व्यथा
सोनाक्षी सिन्हाचं नाव बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या गणनेत येतं. ज्यामुळे ती केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये ओळखली जाते. आज ती जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी सोनाक्षी सिन्हाने खूप संघर्ष केला आहे. सध्या सोनाक्षी सिन्हा मीडियातील तिच्या एका विधानामुळे चर्चेत आहे. ज्यामध्ये तिने सांगितले आहे की, एकेकाळी लोकांनी तिला खूप चुकीची वागणूक दिली होती.

त्यादरम्यान अनेक लोकांनी तिला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला. ज्याला ती थांबवू शकत नव्हती. सोनाक्षी सिन्हा जेव्हा तिच्यासोबत होत असलेल्या चुकीच्या वागण्यावर थांबवण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा तिची अवस्था वाईट झाली होती.

सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयीच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. ज्याची माहिती स्वतः सोनाक्षीने दिली आहे. सोनाक्षीने सांगितलं की, एकदा तिला तिचा ऑटोग्राफ घेण्यासाठी गर्दीने घेरलं होतं. आणि गर्दीतल्या काही लोकांनी तिला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला. ज्याला ती इच्छा असूनही थांबवू शकत नव्हती. सोनाक्षी सिन्हा पुढे म्हणाली की, त्यानंतर ती तासंतास अश्रू ढाळत होती. सोनाक्षी सिन्हाच्या या वक्तव्यानंतर सगळेच विचारात पडले आणि सोनाक्षी सिन्हासोबत घडलेल्या या प्रकाराबाबत तिचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत.