कियारा अडवाणीच्या मिनी स्कर्टची किंमत वाचून बसेल धक्का, तुमच्या महिन्याच्या पगारापेक्षाही जास्त

Kiara Advani Mini Skirt Price: सध्या चर्चा आहे ती म्हणजे कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांच्या आगामी चित्रपटाची. सध्या ते त्यांच्या आगामी सत्यप्रेम की कथा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत आणि त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 25, 2023, 05:22 PM IST
कियारा अडवाणीच्या मिनी स्कर्टची किंमत वाचून बसेल धक्का, तुमच्या महिन्याच्या पगारापेक्षाही जास्त  title=
June 25, 2023 | do you know the price of kiara advanis mini skirt photo viral (Photo: Kiara Advani | Instagram)

Kiara Advani Mini Skirt Price: सध्या सगलीकडेच चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री कियारा अडवाणी यांची. सध्या तिचा आणि कार्तिक आर्यनचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ते दोघंही प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. यावेळी कियारा ही नानाविध पोस्टर्समध्ये दिसते आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आता तिनं घातलेल्या एका आऊटफिटची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की या ड्रेसची नक्की किंमत किती आहे. सेलिब्रेटींच्या आऊटफिट्सबद्दल अनेकदा लिहिलं आणि बोललं जातं. त्याच्या फॅशनेबल लुकसाठी सेलिब्रेटी हे कायमच चर्चेत असतात. तेव्हा चला तर मग पाहुया की नक्की कियाराच्या ड्रेसची एवढी चर्चा का आणि सोबतच तिच्या या ड्रेसची प्राईस किती आहे? 

यावेळी कियारानं एक मस्त आणि क्लासी लुक फॉलो केला होता. यावेळी तिनं ऑफ व्हाईट आणि क्रिम कलरचा ड्रेस परिधान केला होता. यावेळी तिनं व्हाईट टॉप आणि खाली मिनी स्कर्ट घातला होता. यावेळी ती या आऊटफिटमध्ये प्रचंड सुंदर दिसत होती. तिच्या या आऊटफिटची सर्वत्र चर्चा रंगली होती. हा ड्रेस जैक्वेमस ब्रॅण्डचा होता ज्याची किंमत लाखो रूपयांपर्यंत आहे. तिनं आपल्या या लुकचा फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यावेळी तिच्या फोटोखाली अनेकांच्या कमेंट्स येताना दिसत आहेत. तिनं किलरपोजमध्ये हा लुक व्हायरल केला असून तिच्या या लुकनं भलेभले घायाळ झाले आहेत. यावेळी कॅप्शनमध्ये तिनं हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. यावेळी तिच्या या लुकवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 

समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार असे कळते आहे की या मिनी स्कर्टची किंमत चक्क 98, 055 रूपये इतकी आहे. या स्कर्टची खासियत अशी की हा एक ऑफ व्हाईट कलरचा स्किन फीट ड्रेस आहे. त्याचा टॉप त्या स्टाईलचा आहे. यावेळी तिनं आपले केस हे मोकळे सोडले आहेत आणि ड्रेसला सूटेबल असा न्यूड मेकअप केला आहे. सोबतच एम्बेलिश्ड स्ट्रॅप हाई हिल्सही परिधान केली आहेत. 

हेही वाचा - 6 वर्षांच्या मुलाचं Daily Timetable चर्चेत! अभ्यासासाठीचा राखीव Time पाहून अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कियारा आपल्या हटके स्टाईलिंगसाठी कायमच चर्चेत असते. त्यामुळे तिच्या या ड्रेसचीही चांगलीच चर्चा रंगलेली आहे. आता तिच्या या मिनीस्कर्टमुळेही चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.