लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात पडू नका - नीना गुप्ता

नीना गुप्ता यांचा हा व्हिडिओ नक्की पाहाच

Updated: Mar 20, 2021, 03:47 PM IST
लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात पडू नका - नीना गुप्ता  title=

मुंबई : प्रेम एक सुखद आणि चिरकाल टिकणारी भावना आहे. प्रेमाला कोणतीही बंधन नसतात. पण आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतोय ती व्यक्ती खरचं आपल्या सोबत कायम राहिल का? असा एकदा तरी विचार करण्याचा सल्ला अभिनेत्री निना गुप्ता यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत नीना गुप्ता यांनी विवाहित पुरुषाच्या प्रेमात न पडण्याचा सल्ला दिला आहे. महत्त्वाचं  म्हणजे त्यांनी याठिकाणी स्वतःचा अनुभव  सांगितला आहे. 

त्या म्हणाल्या, 'जेव्हा एखादा विवाहीत व्यक्ती कोणत्या महिलेसोबत जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा तो म्हणतो माझं आणि माझ्या पत्नीचं पटत नाही आणि आपण त्यांना पत्नीपासून विभक्त होण्याचा सल्ला देतो. पण तेव्हा हे पुरूष त्यांच्या मुलांचं कारण पुढे करतात.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

सुरुवातीची ओळख, त्यानंतर प्रेमात पडणं. फिरायला जाणं, एकत्र वेळ व्यतीत करणं इथपर्यंत हे नातं येऊन पोहोचतं. पुढे अर्थातच अपेक्षा वाढतात आणि तुम्ही जेव्हा 'त्या' व्यक्तीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करता तेव्हा मात्र त्याचं उत्तर तुम्हाला हादरवणारं असतं.

लग्नाचा विषय  निघाला तर तो पुरूष पाठ फिरवतो. म्हणतो मी या सर्व गोष्टी करू शकत  नाही. आपलं जे काही आहे ते  इथेचं थांबवूया. तो पुरूष तुमच्यासोबत राहण्यास नकार देतो, तेव्हा तुम्ही काय कराल? 

या सर्व परिस्थितींचा अनुभव मी माझ्या आयुष्यात घेतला आहे. त्यामुळे निना गुप्ता यांनी लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात पडू नका असा सल्ला दिला आहे. खासगी आयुष्यात नीना गुप्ता यांनी काही आव्हानांचा सामना केला आहे. पण, या आव्हानांनी खचून न जाता त्यांनी मोठ्या धीराने चित्रपटसृष्टीक स्वत:ची वेगळी ओळख प्रस्थापित केली.