मुंबई : बॉलिवूडचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'एक व्हिलन रिटर्न्स'चा ट्रेलर मुंबईत लाँच करण्यात आला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. पण यादरम्यान दिशा पटनीला स्टेजवर बोलावताच तिचा लूक पाहून सगळेच तिच्या किलर लूकवर आणि सुंदर सौंदर्यावर घायाळ झाले आहेत.
घातला ब्लॅक रिवीलिंग ड्रेस
या खास प्रसंगी दिशा पटानी काळ्या रंगाचा असा आकर्षक ड्रेस परिधान करून पोहोचली की, लोकं तिला बघतच राहिले. यावेळी दिशाने काळ्या रंगाच्या लाँग स्कर्टसह त्याच रंगाचा ब्रॅलेट परिधान केला होता.
लोकांच्या नजरा कंबरेवर खिळल्या
दिशा पटानीचा हा ड्रेस इतका खुलून दिसत होता की, अभिनेत्री स्टेजवर येताच लोकांच्या नजरा तिच्या कंबरेवर खिळल्या. दिशाचा हा ड्रेस इतका टाईट होता की तिला चालतानाही खूप त्रास होत होता. स्टेजवर अभिनेत्री हाई हिल्स आणि घट्ट कपड्यांमध्ये अतिशय काळजीने चालताना दिसली.