Dilip Joshi Birthday : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील जेठालाल हा सगळ्यांचा लाडका आहे. जेठालालचा आज 56 वा वाढदिवस आहे. दिलीप जोशी यांनी फक्त मालिकांमध्ये नाही तर चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. दिलीप दोशी यांनी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत काम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता अनेकांना आठवणार नाही की दिलीप जोशीनं नक्की कोणत्या चित्रपटात काम केलं. तर दिलीप जोशी यांनी 1989 साली प्रदर्शित झालेल्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात त्यांनी एका नोकराची भूमिका साकारली होती. तर तुम्हाला माहितीये का एक काळ असा होता जेव्हा दिलीप जोशी यांनी ट्रॅव्हल एजेंसी सुरु केली होती.
दिलीप जोशी यांनी एका मुलाखतीत या विषयी सांगितले होते की अभिनेता होण्याच्या पाच वर्षांआधी ते ट्रॅव्हल एजेंट म्हणून काम करत होते. त्या ट्रॅव्हल एजंसीसाठी ते 12 तास काम करायचे पण त्यांना जास्त प्रॉफिट होत नव्हता. त्या ट्रॅव्हल एजंसीमध्ये ते पार्टनर होते. त्यावेळी ते सकाळी 9 वाजता ऑफिसला जायचं आणि रात्री 9 वाजता घरी यायचे. त्यांच्या कामाविषयी बोलताना पुढे दिलीप जोशी म्हणाले की त्यांच्या ट्रॅव्हल एज्नसीती ट्रीप बूक करणाऱ्या लोकांसाठी ते लक्झरीयर बसचा बंदोबस्त करायचे ज्या मुंबई ते अहमदाबाद आणि मुंबई ते भावनगर अशा चालत होत्या.
दिलीप जोशी यांच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्यानं 1990 मध्ये जयमाला यांच्याशी लग्न केलं. दिलीप जोशी आणि जयमाला यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलाचं नाव ऋत्विक जोशी आणि लेकीचं नाव नियती जोशी असं आहे. दिलीप जोशी यांची मुलगी नियती जोशीचं 2021 साली लग्न बंधनात अडकली. त्यावेळी तिच्या पांढऱ्या केसांवरून सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु होत्या. काही नेटकऱ्यांनी तिला पाठिंबा दिला होता तर काही लोकांनी तिला ट्रोल केलं होतं. त्यावर नियतीनं या सगळ्या प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया देत सांगितले की ती जशी आहे तसंच लोकांनी तिला एक्सेप्ट करायला हवं.
हेही वाचा : लेकीविषयी बोलताना भावूक होत Milind Gawali म्हणाला, "मिथिलासारखा एखादा कोच..."
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेविषयी बोलायचं झालं तर ही मालिका सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या मालिकेचे निर्माते असीत मोदी यांच्यावर मालिकेतील महिला कलाकारांनी त्यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता.