'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतील ''ही'' अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

लग्नाचा मोसम अजूनही सुरूच आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 11, 2018, 10:52 AM IST
'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतील ''ही'' अभिनेत्री अडकली विवाहबंधनात  title=

मुंबई : लग्नाचा मोसम अजूनही सुरूच आहे. 

 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतील अभिनेत्री एक अभिनेत्री नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे.  मँगो बर्फी म्हणून लोकप्रिय झालेली प्रगल्भा म्हणजे रसिका वेंगुर्लेकर विवाहबंधनात अडकली आहे. 

रसिका - अनिरूद्धचा प्रेमविवाह

रसिकाने फ्रेशर्स मालिकेचा दिग्दर्शक अनिरुद्ध शिंदेसोबत संसार थाटला आहे. अनिरुद्ध आणि रसिका यांचा हा प्रेमविवाह आहे. हे दोघे एकमेकांना गेल्या 10 वर्षापासून ओळखतात. गेल्यावर्षी 3 मे 2017 रोजी दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यांच्या साखरपुड्याला 'फ्रेशर्स' मालिकेतील कलाकार मिताली मयेकर, रश्मी अनपट, अमृता देशमुख, ओंकार राऊत, सिद्धार्थ खिरीद, अमित खेडेकर उपस्थित होते.

रसिका दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेतील तिने बिल्डिंगचे सेक्रेटरी नागांवकर यांच्या मुलीची म्हणजे प्रगल्भाची भूमिका साकारली आहे. अनिरुद्धने 'फ्रेशर्स' मालिकेसोबतच 'का रे दुरावा'चे ही दिग्दर्शन केले आहे. तर रसिकाने अनिरुद्ध शिंदेच्या 'फ्रेशर्स' मालिकेतील रेणुका भिल्लारेची तसेच 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेत प्रगल्भाची भूमिका केली आहे. रसिका सध्या 'तु माझा सांगाती' या मालिकेत राधीची भूमिका करत आहे.

रसिका आणि अनिरूद्ध यांचा हा विवाह सोहळा खूप खासगी होता. यावेळी अगदी जवळचा मित्र - परिवार आणि कुटुंबिय उपस्थित होते.