रूग्णालयातून सुट्टी मिळताच बिग बींनी लिहिली कविता

रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच बिग बी अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा नव्या दमाने कामाला सुरूवात केली आहे. नुकतीच त्यांनी रूग्णालयातील अनुभवांवर एक छानशी कविता लिहीली आणि ती आपल्या ब्लॉगवर चाहत्यांसाठी पोस्टही केली.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 11, 2018, 10:25 AM IST
रूग्णालयातून सुट्टी मिळताच बिग बींनी लिहिली कविता title=

मुंबई : रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच बिग बी अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा नव्या दमाने कामाला सुरूवात केली आहे. नुकतीच त्यांनी रूग्णालयातील अनुभवांवर एक छानशी कविता लिहीली आणि ती आपल्या ब्लॉगवर चाहत्यांसाठी पोस्टही केली.

रूग्णालय हा तर जीवनाचाच भाग

अमिताभ बच्चन यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे लिलावती रूग्णालयात शुक्रवारी दाखल करण्यात आले होते. बच्चन यांनी म्हटले आहे की, रूग्णालयात जाणे हे त्यांच्यासाठी नेहमीचाच अनुभव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जीवनाचा तो एक भागच बनला असल्याचे ते सांगतात.

अमिताभ यांच्या ब्लॉगवरील  कवितेच्या सुरूवातीच्या ओळी...

 जी, हां जनाब मैं अस्पताल जाता हूं,
 बचपन से ही इस प्रतिक्रिया को जीवित रखता हूं,
 वहीं तो हुई थी मेरी प्रथम पैदाइशी चितकार, 
 वहीं तो हुआ था अविरल जीवन का मेरा स्वीकार, 
 इस पवित्र स्थल का अभिनंद करता हूं मैं, 
 जहां ईश्वर की बनाई प्रतिमा की जांच होती हैं तय।’