Dharmaveer : आनंद दिघे यांनी जेव्हा शिवसेना नगरसेवकाच्या कानाखाली वाजवली

आनंद दिघे यांच्या आयुष्यातील हा किस्सा त्यांची लोकांना मदतीसाठी असलेली तळमळ दाखवते.

Updated: Apr 28, 2022, 05:43 PM IST
Dharmaveer : आनंद दिघे यांनी जेव्हा शिवसेना नगरसेवकाच्या कानाखाली वाजवली title=

मुंबई : आनंद दिघे (Aanand Dighe) यांनी शिवसेना ठाणे जिल्ह्यात वाढवली. लोकांची कामे करण्यासाठी ते नेहमी पुढे असायचे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यानंतर त्यांचा दबदबा होता. टेंबीनाक्यावर त्यांचं आनंदआश्रम होतं. जे त्यांचं कार्यालयासारखंच होतं. कोणत्याही व्यक्तीला मदतीसाठी ते पुढे असायचे. कोणत्याही प्रकारचा त्रास असला तरी लोकं त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी येत असे.

एक महिला अशीच एक दिवस त्यांच्याकडे मदती मागण्यासाठी आली होती. पती गमवल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी महिलेला पीठाची गिरणी सुरु करायची होती. पण महिलेला परवानगी मिळत नव्हती. महापालिका आणि कोणत्याही नेत्याकडून मदत मिळाली नाही. मग त्यांनी आनंद दिघे यांच्याकडे मदतीसाठी जाण्याचं ठरवलं. 

आनंद दिघे (Aanand Dighe) यांनी महिलेला विचारलं तुमची काय समस्या आहे. महिलेने त्यांना होत असलेला त्रास सांगितला. त्यानंतर त्या भागातील नगरसेवकाला आनंद दिघे यांनी बोलावलं. आनंद दिघे यांनी विचारलं की, या महिलेला ओळखता का? नगरसेवकाने हो म्हटलं. या महिला काही तरी कामासाठी आल्या होत्या. असं उत्तर त्यांनी दिलं. 

नगरसेवकाचं उत्तर ऐकल्यानंतर आनंद दिघे यांनी या नगरसेवकाला जवळ बोलवलं. जवळ बोलवून दिघे यांनी या नगरसेवकाच्या कानाखाली वाजवली. यानंतर महिला देखील घाबरली. महिलेला मदत केली नाही. म्हणून आनंद दिघे चिडले होते.

महिलेला लगेचच मदत मिळाली. सर्व परवानगी मिळाली आणि महिलेची पीठाची गिरणी दसऱ्याच्या दिवशी सुरु झाली. या महिलेसोबत त्यावेळी त्यांचा मुलगा देखील होता. आज तोच मुलगा मराठी चित्रपटसृष्टीत एक मोठा दिग्दर्शक आहे.